आग्रा, 1 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) जिल्ह्यातील माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसुतीनंतर गरीब दाम्पत्याला 35000 रुपये जमा करता न आल्याने नवजात मुलाचा लिलाव करण्यात आला. डॉक्टरांनी जबरदस्तीने कागदावर अंगठा लावून मुलाच्या बापाकडून बाळ हिसकावून घेतल्याचा आरोप आहे.
दुसकीकडे महिला रुग्णालयाकडे बाळ देण्यासाठी हात जोडून विनवणी करीत होती. मात्र पतीही यात काहीच करू शकला नाही. पीडित कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, रुग्णालयाला फी न दिल्याने डॉक्टरांनी सांगितले की पैसे दिले नाही तर बाळ द्यावं लागेल.
एक लाख रुपयांत केला लिलाव
यानंतर दाम्पत्याला जबरदस्तीने एका कागदावर अंगठा लावायला सांगितला आणि नवजातसाठी 65 हजार रुपये देऊन पाठवलं. सांगितले जात आहे की डॉक्टरांनी मुलाचा लिलाव 1 लाख रुपयात केला होता. 35 हजार रुपयाचे रुग्णालयाचे बिल जमा केल्यानंतर पीडित रिक्षा चालकाला 65 हजार रुपये देऊन घरी पाठवलं. दाम्पत्याने आरोप केला आहे की, डॉक्टरांनी नवजात बाळाला 1 लाख रुपयात विकले. त्यानंतर त्यातील 35 हजार रुपये कापून 65 हजार रुपये दाम्पत्याला दिले.
शंभू नगर निवासी शिव नारायण रिक्षा चालक आहेत. त्यांनी सांगितले की चार महिन्यांपूर्वी त्यांंचं घर कर्जात गेलं होतं. 24 ऑगस्टला त्याची पत्नी बबिताला प्रसव कळा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी जवळील जेपी रुग्णालयात दाखल केलं, बबिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. 25 ऑगस्ट रोजी डिस्चार्ज करण्याची वेळ आली तेव्हा रुग्णालयाने 35000 रुपयांचं बिल दिलं. रिक्षा चालक इतकी मोठी रक्कम देऊ शकत नव्हता. त्याच्याजवळ केवळ 500 रुपये होते.
डॉक्टर म्हणाले, बाळाला तर द्यावचं लागेल
रुग्णालयाचं बिल न दिल्यामुळे डॉक्टर म्हणाले, की बिलाची रक्कम दिली नाही तर पैसे द्यावे लागेल. यानंतर दाम्पत्याला जबरदस्तीने कागदावर अंगठा द्यायला सांगितले आणि नवजात बाळाला घेत 65000 रुपये देऊन पाठवलं.