ओब्रा,07 सप्टेंबर: उत्तर प्रदेशात गेल्या एत दीड महिन्यात तिसऱ्यांदा तर देशात 4थ्यांदा रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना घडली आहे. हावडा जबलपूर शक्तीपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले आहे.
ही घटना आज सकाळी उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्ह्यात घडली. दरम्यान या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. रूळ तुटले असल्यामुळे ही ट्रेन रूळांवरून घसरल्याचं सांगण्यात येतंय. रेल्वे अधिकारी वेळेवर घटनास्थळी पोचल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या सात डब्यातील प्रवाशांना रूळांवरून न घसरलेल्या उरललेल्या डब्यांमध्ये बसवण्यात आलं. त्यानंतर या ट्रेनचा प्रवास सुरू झाला. दुर्घटनास्थळी आता एकही यात्री नसल्याचं सांगण्यात येतंय.