नवी दिल्ली, 03 मार्च : दिल्ली हिंसाचारावेळी गोळीबार करणाऱ्या शाहरुखला ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. उत्तर प्रदेशातील शामली इथून शाहरुखला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. दिल्ली हिंसाचाराच्या दरम्यान थेट पोलिसांवरच शाहरुखने पिस्तुल रोखलं होतं. त्याने तीन राउंड फायर केले होते. शाहरुखची चौकशी सुरू असून तो टिकटॉक व्हिडिओ करायचा तसेच मॉडेलिंगची आवड असल्याचंही समोर आलं आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहरुखजवळ असलेली पिस्तुल बिहारमधील मुंगेर इथं तयार करण्यात आली होती. कारखान्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून ती खरेदी केली होती. पिस्तुल ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्राथमिक चौकशीत रागात फायरिंग केल्याचं आरोपीने सांगितल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं.
गोळीबाराबाबत शाहरुखकडे चौकशी केली असता त्यानं दिलेली माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितली. तो एकटाच आंदोलनासाठी आला होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याआधी चौकशी करण्यात येईल. शाहरुखने पळून जाण्यासाठी एस्टीम गाडीचा वापर केला होता. ताहीरसोबत कनेक्शन आहे का याचीही चौकशी करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं.
Delhi: Shahrukh (in chequered shirt), the man who had opened fire at police during violence in North East Delhi on 24th February brought to old Police Headquarters, ITO. He was arrested by Delhi Police Crime Branch from Uttar Pradesh. pic.twitter.com/Ww3sRThNPo
— ANI (@ANI) March 3, 2020
शाहरुखला मॉडेलिंग करण्याची आवड होती. तो टिकटॉक व्हिडिओसुद्धा तयार करत होता. त्यानं म्यूझिक व्हिडिओही केला आहे. तसंच शाहरुख जिममध्येही जायचा. तो पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा : गोमूत्र, शेणामुळे बरा होईल कोरोनाव्हायरस, भाजप आमदाराचा अजब दावा
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात दिल्लीत हिंसक निदर्शनं झाली. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारादरम्यान, गोळाबार करणाऱ्या आणि पोलिसांवरच बंदूक रोखणाऱ्या लाल रंगाचं टी-शर्ट घातलेला तरुण हा शाहरुख होता. माहिती मिळाल्यापासून, पोलीस आणि विशेष सेल त्याचा शोध घेत होते. आतापर्यंत 40 हून अधिक लोक दिल्लीतील हिंसाचारामध्ये मारले गेले आहेत.
हे वाचा : 22 वर्षे देशासाठी कातडं झिजवलं पण दिल्ली हिंसाचारानं क्षणात रस्त्यावर आणलं