• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पंतप्रधान मोदींसह 'Time' मध्ये झळकल्या दिल्लीतील शाहीनबागच्या दादी; जगातील प्रभावी व्यक्तींमध्ये आलं नाव

पंतप्रधान मोदींसह 'Time' मध्ये झळकल्या दिल्लीतील शाहीनबागच्या दादी; जगातील प्रभावी व्यक्तींमध्ये आलं नाव

बिल्कीस यांच्यामुळे आंदोलनकर्त्यांना व विद्यार्थ्यांना एक उर्जा मिळाली आणि आशा निर्माण झाली होती. रक्ताच्या शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत आपण लढू व न्याय मिळवू सर्वांना मोकळा श्वास देऊ, असं त्या म्हणायच्या.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : शाहीनबाग आंदोलनाच्या चेहरा बनलेल्या तसेच या आंदोलनातील शाहीनबागच्या दादी म्हणून प्रसिद्ध झालेल्या बिल्किस बानो यांना टाइम मॅग्झिनमध्ये सर्वात प्रभावी पाच भारतीयांमध्ये स्थान देण्यात आलं आहे. सीएएच्या विरोधात हे आंदोलन होतं. डिसेंबर 2019 मध्ये पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर हे आंदोलन सुरू झालं होतं. सीसीए अर्थात सिटिझन अमेंडमेंट ॲक्टविरोधात देशभरात आंदोलनं झाली होती. यातील शाहीनबागचं आंदोलन सर्वत्र गाजलं. यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला होता. बिल्किस बानो या अनेक वृद्ध महिलांसोबत या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विशेष बाब म्हणजे जानेवारीतील कडक थंडीत सकाळी 8 वाजेपासून ते मध्यरात्रीपर्यंत त्या या आंदोलनात सहभागी असायच्या. पत्रकार राणा अयुब यांनी त्यांचा उल्लेख शाहीनबागची दादी असा केला. तेव्हापासून त्यांना या नावानेच लोक ओळखायला लागले. त्या 82 वर्षांच्या आहेत. तरीही त्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे चर्चेत आल्या. नवी दिल्लीतील मुस्लिमबहुल जामियानगरातील शाहीनबाग एक भाग आहे. बिल्किस बानो यांचा सहभाग हा चर्चेचा व लक्षवेधी ठरला. बिल्कीस यांच्यामुळे आंदोलनकर्त्यांना व विद्यार्थ्यांना एक उर्जा मिळाली आणि आशा निर्माण झाली होती. रक्ताच्या शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत आपण लढू व न्याय मिळवू सर्वांना मोकळा श्वास देऊ, असं त्या म्हणायच्या असं अयुब यांनी लेखात नमूद केलं होतं. हे ही वाचा-Fit India Movement : क्रिकेटमधील Yo-Yo Test विषयी मोदींनी विराटला विचारला सवाल मुस्लिम महिलांचा या आंदोलनात मोठा सहभाग हे या आंदोलनाचं एक वैशिष्ट्यं होतं. शाहीनबागचं हे आंदोलन 101 दिवस सुरू होतं. 23 मार्चला पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते थांबवलं.  न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक झोया हसन म्हणाल्या होत्या की, 'मुस्लीम महिलांची जुनी ओळख या आंदोलनाने पुसली आहे.'  या सर्व घडामोडींची दखल घेत टाइम्स मॅग्झिननी बिल्किस बानो यांना प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या यादीत स्थान दिलं. समाजावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे त्याचा गौरव टाइमने केला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: