शाहीनबाग : आंदोलन सुरूच राहावं म्हणून महिलांनी एकेक करत केलं मतदान

शाहीनबाग : आंदोलन सुरूच राहावं म्हणून महिलांनी एकेक करत केलं मतदान

शाहीनबागमधलं आंदोलन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता. पण निवडणूक झाली तरी आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असं आंदोलकांचं म्हणणं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : दिल्लीमधल्या शाहीनबागमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA)आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन सुरूच राहावं म्हणून विधानसभा निवडणुकीत (Dehi assembly election)महिलांनी एकेक करत मतदान केलं.

आंदोलनातल्या काही महिलांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला तर काही महिलांनी दुपारी मतदान केलं. एक तुकडी संध्याकाळी मतदानासाठी गेली. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मतदान केलं, असं या आंदोलकांनी सांगितलं.

शाहीनबागमधल्या आंदोलकांना अरविंद केजरीवाल बिर्याणी देतायत, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. यावर त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसही पाठवली.

शाहीनबागमधलं आंदोलन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता. पण निवडणूक झाली तरी आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असं आंदोलकांचं म्हणणं आहे.

(हेही वाचा : दिल्लीत मोदी-शहा मॅजिकचा धुव्वा उडवत पुन्हा केजरीवाल!)

दिल्लीच्या निवडणुकीत राजकीय पक्ष आंदोलकांना पैसे पुरवतायत, असे आरोप झाले. आंदोलकांना हेच पक्ष बिर्याणी खाऊ घालतात, असंही म्हटलं गेलं पण हे आंदोलन राजकीय नाही.आम्ही निवडणुकीनंतरही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लढत राहणार आहोत, असंही या आंदोलकांचं म्हणणं आहे. कोणताही राजकीय पक्ष आम्हाला बिर्याणी देत नाही, महिला स्वयंपाक करून आंदोलकांना खाऊ घालतात, असंही त्यांनी सांगितलं.

(हेही वाचा : पंजाबमधल्या स्फोटाबद्दल पोलिसांचा यू टर्न, तरनतारनमध्ये 2 जणांचा मृत्यू)

दिल्लीमध्ये जामिया विद्यापीठ आणि शाहीनबाग परिसरात झालेल्या गोळीबारामुळे हे आंदोलन आणखीनच चर्चेत आलं. आंदोलनाला हिंसक वळणही लागल्यामुळे या आंदोलनाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आता दिल्लीच्या निवडणुकीनंतर हे आंदोलन कोणत्या स्वरूपात होईल ते पाहावं लागेल.

===========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: caadelhi
First Published: Feb 8, 2020 08:44 PM IST

ताज्या बातम्या