Home /News /national /

आसाम तोडण्याची भाषा करणाऱ्या शरजील इमामला अटक; शाहीन बागच्या CAA विरोधी आंदोलनात अग्रस्थानी

आसाम तोडण्याची भाषा करणाऱ्या शरजील इमामला अटक; शाहीन बागच्या CAA विरोधी आंदोलनात अग्रस्थानी

देशद्रोहाच्या आरोपानंतर शरजील हा फरार होता. दिल्ली पोलिसांनी त्याला आज बिहारमध्ये अटक केलीय.

  नवी दिल्ली 28 जानेवारी : CAA आणि NRCच्या विरोधात दिल्लीतल्या शाहीन बागमध्ये निदर्शने सुरु आहेत. मुस्लिम महिला गेल्या 45 दिवसांपासून तिथे ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्या निदर्शकांसमोर बोलतानाचा एक वादग्रस्त भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जेएनयुचा विद्यार्थी शरजील इमाम याचा तो व्हिडीओ होता आणि त्यात तो आसामला भारतापासून तोडण्याची भाषा करत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणानंतर शरजील हा फरार होता. पोलिसांनी त्याला आज बिहारमध्ये अटक केलीय. बिहारच्या जेहानाबादमध्ये दिल्ली पोलिसांनी कारवाई करत शरजीलला ताब्यात घेतलं. त्याचं भाषण अतिशय वादग्रस्त ठरलं होतं. गेल्या 15 डिसेंबरपासून राजधानी दिल्लीतील शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास पंचेचाळीस दिवसाचा कालावधी झाला आहे. आगामी अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा चंग शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी बांधला आहे. मोर्चा घुसखोरांविरुद्ध, CAA आणि NRCला समर्थन नाही - राज ठाकरे या आंदोलनामध्ये महिला बालक आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. महिला या समाजातील पहिल्या घटक आहे, हे समजुन या आंदोलनात जे धरणे प्रदर्शन सुरू आहे. त्या धरणे प्रदर्शनात सर्वात प्रथम महिला बसलेल्या आहेत. या महिलांमध्ये मुली तरुणी आणि वयोवृद्ध महिला सहभागी झालेल्या आहेत. यांच्यासाठी येथे हे मंडप टाकण्यात आलेला आहे. या मंडपाच्या आत थंडीची पर्वा न करता या महिला आंदोलन करत आहे. VIDEO...नाही तर बँक फोडून टाकेल, खासदार नवनीत राणा बँक अधिकाऱ्यांवर भडकल्या राजधानी दिल्लीतील थंडी ही प्रचंड बोचरी असते या बोचरी थंडीची तमा या महिलांनी बाळगली नाही आणि जवळपास 24 तास त्या आंदोलनात सहभागी असतात, काही महिला आजारी आहेत तरीपण बाजूला सहभागी आहे. काही महिलांची बालके शाळेत जातात त्यांना शाळेत पाठवल्यानंतर या महिला प्रदर्शनात सहभागी होतात अशा तऱ्हेने हे प्रदर्शन सुरू आहे.

  जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात गवळी सुप्रीम कोर्टात, शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण

  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात रणकंदन माजले आहे. याची सुरुवात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीने पोलीस अत्याचार झाले त्याचा निषेध म्हणून शाहीन बाग मध्ये प्रथम आंदोलनाला सुरुवात झाली.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Citizenship Amendment act

  पुढील बातम्या