भारताच्या 'या' माजी IAS अधिकाऱ्याला वाटतं इम्रान खानना 'शांततेचं नोबेल' मिळावं

इम्नान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जावा अशी मागणी आता केली जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 10:38 AM IST

भारताच्या 'या' माजी IAS अधिकाऱ्याला वाटतं इम्रान खानना 'शांततेचं नोबेल' मिळावं

श्रीनगर, 3 मार्च : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी आता भारतातून केली जात आहे. शाह फैजल या माजी आयएएस अधिकाऱ्यांनं ही मागणी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केलं आहे. 2010मध्ये युपीएससीत देशात अव्वल येण्याचा मान शाह फैजल यांनी मिळवला होता. अशी कामगिरी करणारे शाह फैजल काश्मीरमधील पहिलेच विद्यार्थी होते. पण, सरकारच्या ध्येय - धोरणांवर नाराजी व्यक्त करत फैजल यांनी पदाचा राजीनामा दिला.

शाह फैजल आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरणार असल्याची चर्चा सध्या घाटीमध्ये सुरू आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली करत इम्नान खान यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल टाकलं. त्यामुळे दक्षिण आशियामधील तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. अशा आशयाचं ट्विट फैजल यांनी केलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी संसंदेमध्ये देखील इम्नान खान यांना नोबेल पुरस्कार दिला जावा असा प्रस्ताव सादर करण्यात आला.अभिनंदन यांची घरवापसी

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्ताननं देखील भारताच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेत दबावापुढे झुकत सोडून देखील दिलं. त्यावरून आता इम्नान खान यांना शांततेचं नोबेल देण्याची मागणी केली जात आहे. त्याला शाह फैजल यांनी देखील समर्थन दिलं आहे. यापूर्वी त्यांनी एअर स्ट्राईकबद्दल देखील कुणाला फायदा झाला? असा सवाल केला होता.
4 जवान शहीद

जम्मू - काश्मीरमधील हंदवाडामध्ये मागील 72 तासापासून लष्कर आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये जम्मू काश्मीरच्या 2 पोलिसांसह सीआरपीएफचे 2 जवान शहीद झाले आहेत. तर, 4 स्थानिक लोक देखील जखमी झाले आहेत. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. बाबागुंडमध्ये लष्करानं पोलिसांच्या मदतीनं सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर फायरींग सुरू केली. यामध्ये 9 जवान जखमी झाले आहेत. तर, 4 जवान शहीद झाले आहेत.


Special Report : मोनोरेल सुरू होतेय; मुंबई धावणार का सुसाट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...