News18 Lokmat

काश्मीरचा हा माजी IAS अधिकारी काढणार राजकीय पक्ष

शाह फैजल आता राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 11:55 AM IST

काश्मीरचा हा माजी IAS अधिकारी काढणार राजकीय पक्ष

श्रीनगर, 17 मार्च : शाह फैजल!2010 मध्ये युपीएससी परिक्षेत देशात अव्वल येण्याचा मान मिळवला आणि शाह फैजल हे नाव साऱ्या देशात गाजलं. त्यानंतर शाह फैजल हे काश्मीरमधील तरूणांच्या गळ्यातील ताईत बनले. पण, शासकीय सेवेला रामराम करत शाह फैजल यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामा देताना त्यांनी सरकारच्या जम्मू काश्नीरमधील ध्येय धोरणांवर टीका केली. जम्मू - काश्नीरच्या सध्याची अवस्था पाहता राजकारणात उतरण्याचा निर्णय फैजल यांनी घेतला. त्यानंतर शाह फैजल कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार? यावर चर्चा रंगली होती. पण, शाह फैजल यांचा निर्णय झाला असून त्यांनी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शाह फैजल जम्मू अॅण्ड काश्मीर पिपल्स मुव्हमेंट नावानं पक्ष स्थापन करणार असून आज त्याची श्रीनगरमधील राजभाग येथे घोषणा होणार आहे. जानेवारीमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी आपल्या राजकीय इच्छा स्पष्ट केल्या होत्या.


कोण आहेत शाह फैजल?

17 मे 1983 रोजी जन्मलेले शाह फैजल मूळचे जम्मू-काश्मीरमधील आहे. फैजल याचं वय 35 वर्षे आहे. 2010मध्ये शाह फैजल युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर ते काश्नीरमधील पहिले IAS टॉपर झाले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शाह फैजल यांचं कौतुक केलं होते. अखेर 9 जानेवारी 2019 रोजी शाह फैजल यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता.


Loading...

मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली, गोव्यात सत्ताबदलासाठी हालचालींना वेग


शाह फैजल यांच्या त्या ट्विटवरून वाद

विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली करत इम्नान खान यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल टाकलं. त्यांच्या या निर्णयामुळे दक्षिण आशियामधील तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात यावी असं मत शाह फैजल यांनी ट्विटरवरून मांडलं होतं.
SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 11:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...