• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • 5 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी 53 वर्षांच्या प्राध्यापकाला 53 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

5 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी 53 वर्षांच्या प्राध्यापकाला 53 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पाच विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्राध्यापकाला कोर्टानं शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:
तमिळनाडू, 02 सप्टेंबर: महिलांवरचे लैंगिक अत्याचार (Sexual Harrasment of Women) ही मानवजातीला लागलेली कीड आहे. गेल्या काही वर्षांत हे गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढल्याचं बोललं जातं. या गुन्ह्यांची तक्रार दाखल करण्याचं धारिष्ट्य पीडित महिला-तरुणींकडून दाखवलं जाऊ लागल्यामुळे अशा प्रकरणांची संख्या वाढलेली दिसते खरी; पण त्यामुळे गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात सापडून त्यांना शिक्षा होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. पाच विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तमिळनाडूतल्या (Tamilnadu) एका सरकारी कॉलेजमधल्या (Government College) 53 वर्षांच्या एका सहायक प्राध्यापकाला (Assistant Professor) 53 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा (Jail Term) कोर्टाने ठोठावली आहे. अशा कठोर शिक्षेमुळे समाजातल्या अशा गुन्ह्यांचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. 'एबीपी नाडू' आणि 'एबीपी लाइव्ह'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. तमिळनाडूतल्या करूर (Karur) जिल्ह्यातल्या थान्तोनीमलाई (Thantonimalai) इथल्या गव्हर्न्मेंट आर्ट्स कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या इलँगोव्हन (Pro. Ilangovan) यांच्याविरुद्ध कॉलेजातल्या पाच विद्यार्थिनींनी 26 एप्रिल 2019 रोजी लैंगिक अत्याचाराची तक्रार केली. कॉलेज व्यवस्थापनाला ही माहिती मिळाल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने करूर महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रा. इलँगोव्हन यांना अटक केली. लैंगिक अत्याचार, तसंच अनुसूचित जाती/जमाती अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी प्रा. इलँगोव्हन यांच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल केले. प्रा. इलँगोव्हन यांनी जामिनासाठी 2019मध्येच अर्ज केला होता; मात्र त्यांनी तो अर्ज केल्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांच्या कक्षाबाहेर आंदोलन केलं. पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर रॅलीही काढली. करूर जिल्हा मुख्य सेशन्स कोर्टाने (Karur District Principal Sessions Court) जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं.

डबल मर्डरने उडाली खळबळ, मित्रांसोबत गेलेल्या दोन तरुणांचा खून, शेतात सापडले मृतदेह

करूर जिल्हा कोर्टात अलीकडेच या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली. पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोर्टाने 53 वर्षांच्या प्रा. इलँगोव्हन यांना 53 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. कठोर शिक्षा झाल्यामुळे समाजातल्या अशा मानसिकतेच्या आणि अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसण्याची, त्यांना असे गुन्हे न करण्याचा धडा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निकाल ऐकल्यावर विद्यार्थ्यांनी कोर्टाच्या आवारात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी न्यायाधीश आणि वकिलांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. चेन्नईत शाळांमधल्या शिक्षकांविरोधात मी टू चळवळही (Me Too movement) मोठ्या प्रमाणात राबवली गेली होती, असं एबीपी लाइव्हच्या बातमीत म्हटलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published: