पाटणा 11 मे: कोरोनानं (Coronavirus) लोकांना केवळ मानसिक, शारीरिक आणि आर्थिक बाजूंनी ग्रासलं नाही तर या काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही पाहायला मिळाल्या. अशीच रुची आणि रोशनची एक कथा आता समोर आली आहे. या घटनेत रुची 26 दिवस आपल्या पतीसाठी रुग्णालयातील घाणेरड्या व्यवस्थेसोबत लढत राहिली. मात्र, इतके प्रयत्न करुनही ती आपल्या पतीला वाचवू शकली नाही. पैशांसाठी तिचं शोषण झालं ते वेगळंच. या सगळ्या गोष्टी आठवून आता तिच्या डोळ्यातील अश्रूही थांबण्याचं नाव घेत नाहीत.
या २६ दिवसांमध्ये रुचीनं जे काही सहन केलं ते अतिशय भयंकर होतं. तिनं आपल्या पतीच्या डोळ्यांमध्ये ऑक्सिजन संपण्याची भीती पाहिली. पाटणाच्या या खासगी रुग्णालयानं आपल्याकडे दाखल असणाऱ्या रुग्णांनाच काळाबाजार करत ऑक्सिजन विकला आणि तिनं आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी हा विकत घेतलाही. मात्र, ती आपल्या नवऱ्याला वाचवू शकली नाही. रुचीनं आजतकसोबत बातचीत करताना डॉक्टर आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणाबद्दलची माहिती दिली. तिनं असंही म्हटलं, की कोरोनातून एकवेळ माणूस वाचूही शकतो, मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव जाणं निश्चित आहे.
रुची आपल्या पतीसोबत होळीच्या निमित्तानं कुटुंबीयांना भेटण्यासाठी भागलपूरला गेली होती. ९ एप्रिलला तिच्या पतीला ताप आणि सर्दी झाली. उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुची आपल्या पतीची काळजी घेण्यासाठी त्याच्यासोबत रुग्णालयातच थांबत होती. याच काळात रुग्णालयातील कर्मचारी ज्योती कुमारनं तिच्यासोबत छेडछाड (Sexual Harassment By Doctors and Ward boy) केली. उपचार घेत असलेल्या पतीनंही हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहिलं मात्र तो काहीच करू शकला नाही.
ये महिला रोते हुए बता रही है कि डॉक्टर उसके साथ छेड़खानी करता था, लेकिन वो कुछ नहीं कर पाती थी क्योंकि उसी अस्पताल में पति एडमिट था. पति की मौत के बाद महिला ने ये बात कही है.
हम समाज के तौर पर हर दिन धंसते जा रहे हैं. pic.twitter.com/EM9sldWRhF — Ranvijay Singh (@ranvijaylive) May 10, 2021
डॉक्टर व्यवस्थित काळजी घेत नसल्यानं तिनं आपल्या पतीला मायागंज रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे परिस्थिती आणखीच भयंकर होती. ICU मध्ये एकापाठोपाठ एक रुग्णाचा मृत्यू होत होता मात्र कोणीच कोणाचं काही ऐकायला तयार नव्हतं. रुचीनं सांगितलं, की एक व्यक्ती डॉक्टर डॉक्टर ओरडत बेडवरुन खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला आणि रक्त वाहू लागलं. मात्र, तरीही डॉक्टरांना काहीच फरक पडला नाही. डॉक्टर आणि नर्स आपल्या रुममध्ये लाईट ऑफ करुन चित्रपट पाहात बसतात मात्र कोणीच रुग्णांना पाहायला येत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
रुचीची मोठी बहिण ऋचा सिंहनं सांगितलं, की रुग्णालयात डॉक्टर आणि स्टाफ घाणेरड्या नजरेनं पाहायचे. इतकंच नाही तर वारंवार शरीराला हात लावण्याचा प्रयत्न करायचे. मायागंज रुग्णालयातही परिस्थिती गंभीर झाल्यानं रुग्णाला एअर अॅमबुलन्सनं दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वेळेवर न आल्यानं पाटणामधीलच एका खासगी रुग्णालयात रुग्णाला भर्ती करण्यात आलं.
आरोप आहे, की इथेही रुग्णांना लुटलं गेलं. इतकंच नाही तर रुग्णालयानं ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं सांगत आपल्या रुग्णालयात दाखल रुग्णांना ५०-५० हजारात ऑक्सिजन सिलेंडर विकले.
रोशन आणि रुची नोएडामध्ये राहायचे. रोशन सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगलं पॅकेज होतं. मात्र, पैसे असतानाही त्याला मृत्यूआधी प्रचंड यातना आणि त्रास सहन करावा लागला. रुचीचा असा आरोप आहे, की रोशनचा मृत्यू कोरोनानं कमी आणि रुग्णालयातील अव्यवस्था तसंच ऑक्सिजन संपण्याच्या भीतीनं जास्त झाला. या दोघांनी पाच वर्षाआधीच लग्नगाठ बांधली होती. आता पतीच्या आठवणीत रुचीचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.