Home /News /national /

स्त्रियांबाबत अश्लील बोलणाऱ्याला अखेर अटक, महिलांनी Facebook लाइव्ह करत तोंडाला फासलं होतं काळं

स्त्रियांबाबत अश्लील बोलणाऱ्याला अखेर अटक, महिलांनी Facebook लाइव्ह करत तोंडाला फासलं होतं काळं

केरळमध्ये महिलांवर अश्लील कमेंट करून त्याबाबत व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी (26 सप्टेंबर) 3 महिलांनी एका व्यक्तीवर हल्ला करत त्याच्या अंगावर काळं तेल फेकून त्याचा निषेध केला होता.

    तिरुवअनंतपूरम , 29 सप्टेंबर : महिलांवर अश्लील कमेंट करून त्याबाबत व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला केरळमध्ये अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी (26 सप्टेंबर) 3 महिलांनी एका व्यक्तीवर हल्ला करत त्याच्या अंगावर काळं तेल फेकून त्याचा निषेध केला होता. या व्यक्तीने सोशल मीडियावर महिलांविषयी अश्लील व्हिडिओ तयार केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या महिलांनी टोकाचे पाऊल उचलले होते. महत्त्वाचं म्हणजे हा इसम सामाजिक जीवनात मानाचे स्थान असणाऱ्या महिलांविषयी हे अश्लाघ्य भाषेतील व्हिडीओ तयार करत असे. विजय पी. नायर असं या व्यक्तीचं नाव असून फेसबुकवरील एका चॅटमध्ये केरळमधील व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असणाऱ्या भाग्यलक्ष्मी यांच्याविषयी त्यानी अश्लील कमेंट केली होती. त्याचबरोबर इतर अनेक महिलांविषयी देखील विविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्याने असाच  कंटेट पसरवला होता.  यानंतर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट  भाग्यलक्ष्मी आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीलक्ष्मी आणि दिया सना यांनी या व्यक्तीच्या घरी जात त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या घटनेचे फेसबूक लाइव्हही केले. त्यांनी त्याचा लॅपटॉप देखील ताब्यात घेतला आणि तो पोलिसांकडे जमा करण्यात आला आहे. (हे वाचा-सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार, भाज्यांनंतर डाळींच्या दरातही वाढ; हे आहे कारण) या तिनही महिला आणि विजय यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तरीही तो अश्लील बोलत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावर काळं तेल टाकलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्यक्तीवर कारवाई करण्याची जोरदार मागणी सोशल मीडियातून होऊ लागली. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीदेखील या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणात नवीन कायदा तयार करण्याची गरज पडली तर तेदेखील करू असंही विजयन यांनी म्हटलं आहे. आरोग्य आणि सामाजिक कल्याण मंत्री के. के. शैलजा यांनी या महिला कार्यकर्त्यांचे आणि महिला आर्टिस्टच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर विजय नायरवर अतिशय कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर केरळच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष एम. सी. जोसफिन यांनी देखील या महिलांना पाठिंबा दिला आहे. (हे वाचा-सुशांतच्या अंत्यसंस्काराचा VIDEO पाहून भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली...) दरम्यान, या व्यक्तीच्या  ‘Vtrix Scene’ या युट्युब चॅनलवरून काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांविरोधात देखील अश्लील कमेंट आणि भाष्य केलं होतं. भाग्यलक्ष्मी यांच्यावर त्याने भाष्य केल्यानंतर त्यांनी या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा आधिक तपास करत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाग्यश्री आणि इतर महिलांच्या धाडसाचे कौतुक होत आहे, त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देखील मिळत आहे. नायरला त्याच्या तिरुवअनंतपूरम याठिकाणी असलेल्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. keywords :
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या