18 वर्षांखालील पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कारच-सुप्रीम कोर्ट

18 वर्षांखालील पत्नीसोबत शारीरिक संबंध  बलात्कारच-सुप्रीम कोर्ट

15- 18 वयोगटातील पत्नीशी शारीरिक संबंध आता बलात्कारच समजला जाणार आहे. आयपीसीच्या 375 कलमात 15 वर्षावरील पत्नीशी शारिरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही अशी तरतूद होती.

  • Share this:

दिल्ली, 11 ऑक्टोबर: महिला सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 18 वर्षांखालील पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणे हा बलात्कार असून त्यासाठी पतीला अभय देता येणार नाही असं सांगितलं आहे.

दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 15- 18 वयोगटातील पत्नीशी शारीरिक संबंध आता बलात्कारच समजला जाणार आहे. आयपीसीच्या 375 कलमात 15 वर्षावरील पत्नीशी शारिरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही अशी तरतूद होती. याविरूद्ध एका एनजीओने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यापूर्वी लग्नानंतर होणाऱ्या बलात्कारांवर काहीही निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता.

या निर्णयाकडे आता महिला सुरक्षिततेच्या बाबतीत दिला गेलेला एक महत्त्वाचा निर्णय म्हणून पाहिलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 11:11 AM IST

ताज्या बातम्या