स्पा आणि सलूनमध्ये सुरू होतं SEX रॅकेट; पोलिसांनी केला भांडाफोड, नागपूरची महिला ताब्यात

स्पा आणि सलूनमध्ये सुरू होतं SEX रॅकेट; पोलिसांनी केला भांडाफोड, नागपूरची महिला ताब्यात

पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी एक प्लान तयार केला होता.

  • Share this:

भोपाळ, 3 डिसेंबर : येथील पोलिसांनी पुन्हा एकदा Sex रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश केला आहे. येथे स्पा आणि सलूनच्या आड वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती भोपाळ पोलिसांना (Bhopal Police) मिळाली होती. त्यानुसार भोपाळ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोलार भागातील लंडन स्पा सेंटर येथून तीन महिलांसह पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडन स्पा सेंटरमध्ये स्पा आणि सलूनच्या आड वेश्या व्यवसाय सुरू होता.

पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी एक प्लान तयार केला होता. ज्यामध्ये पोलिसांनी एका व्यक्तीची नियुक्ती केली होती. पूर्ण तयार केल्यानंतर या व्यक्तीला कारवाई करण्याचा इशारा देण्याचं ठरलं होतं. पोलिसांनी या भागातून तीन महिलांसह 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडलेल्या महिला या नागपूर, नेपाळ आणि भोपाळमधील राहणाऱ्या आहेत. ज्या महिला येथे सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अडकल्या होत्या. या महिला भोपाळ स्पा सेंटरच्या ऑर्डरवरुन जात होत्या. यापैकी एक महिला ही नेपाळ, एक नागपूर आणि तिसरी महिला भोपाळची आहे. घटनास्थळावरुन अटक केलेले पुरुष हे भोपाळमधील बैरागढचे निवासी आहेत.

हे ही वाचा-भररस्त्यात गुंडगिरी; बेदम मारहाणीचा Video व्हायरल झाला तरी पोलिसांकडून दुर्लक्ष

क्राइम ब्रांचचे एसपी गोपाल धाकड यांनी सांगितले की, आम्हाला काही दिवसांपूर्वी या भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाबाबत माहिती मिळाली होती. भोपाळ शहरातील अनेक भागात अशा प्रकारचे अवैध्य व्यवसाय सुरू आहेत. ज्यावर कारवाई करण्याची गरज आहे. यादरम्यान कोलार भागातील लंडन स्पा येथे कारवाई करण्यात आली. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील. यापूर्वी भोपाळ पोलिसांनी ब्युटी पार्लर, स्पा आणि सलूनमध्ये सुरू असलेल्या काळा धंदा उघडकीस आणला आहे. गेल्या वर्षी अशाच एका स्पा सेंटरमध्ये छापेमारी करण्यात आली होती. संपूर्ण शहरात सेक्स रॅकेटचा व्यवसाय एखाद्या जाळ्याप्रमाणे पसरत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: December 3, 2020, 7:39 PM IST

ताज्या बातम्या