S M L

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे धडे, 20 रुपयांचं पुस्तक विद्यार्थ्यांना 50 रुपयांना !

ही सर्व पुस्तकं १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांच्या पूरक वाचनासाठी खरेदी केलेली आहेत.

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2018 06:42 PM IST

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे धडे, 20 रुपयांचं पुस्तक विद्यार्थ्यांना 50 रुपयांना !

13 फेब्रुवारी : पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचनासाठी खरेदी केलेल्या पुस्तकामुळे वाद निर्माण झालाय.  शालेय शिक्षण विभागाकडूनही  'बाल नचिकेता' पुस्तकं खरेदी करण्यात आलीये.  20 रुपयांचं पुस्तक हे विद्यार्थ्यांना 50 रुपयांना मिळणार आहे. एवढंच नाहीतर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे धडे देण्यात आले आहे.

पण आता या पुस्तक खरेदीची किंमत आणि पुस्तकातल्या मजकुरामुळे वाद निर्माण झालाय. यातला मजकूर जर तुम्ही पाहीला तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. शालेय शिक्षण विभागाने भारती विचार साधना या संस्थेकडून २० रूपयाला विकत घेतलेलं पुस्तक हे विद्यार्थ्यांना ५० रूपयांना विकणार आहे.

याबाबतची सरकारची रेट लिस्ट आणि भारती विचार साधना या संस्थेकडून विकत घेतलेल्या पुस्तकांचा रियालटी चेक न्यूज १८ लोकमतने केली असता ही सर्व पुस्तकं १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांच्या पूरक वाचनासाठी खरेदी केलेली आहेत.

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे धडे

याच्या किंमतीमधली तफावत तर आहेच पण यामधला मजकूरही धक्कादायक आहे. या पुस्तकांमध्ये पुराणातल्या अनेक लैंगिक गोष्टी आहेत. यासोबतच अनेक अश्लील घटनांचे संदर्भ या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. या पुस्तकांमधले मजकूर पाहून ही प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी आहेत का? पहिली ते पाचवीच्या मुलांना या संदर्भांची गरज काय असे अनेक प्रश्न पडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 06:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close