Home /News /national /

लग्नाचं वचन देऊन SEX करणं म्हणजे बलात्कारच असं नाही, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

लग्नाचं वचन देऊन SEX करणं म्हणजे बलात्कारच असं नाही, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

एका महिलेनं तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : लग्नाआधी रिलेशनशीपमध्ये अथवा विवाहाचं वचन देऊन अनेक तरुण-तरुण शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मुलांकडून लग्नाचं वचन पूर्ण झालं नाही तर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला जातो. या संदर्भात एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाचं वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणं हा नेहमीच बलात्कार असतो असं नाही, असा मोठा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. एका महिलेनं यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बलात्काराच्या खटल्याची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर ती स्त्री दीर्घकाळ तिच्या इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवण्यास तयार असेल तर अशा परिस्थितीत लग्नाचं वचन देऊन लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार होत नाही. हे वाचा-'लग्नासाठी धर्मांतर योग्य नाही', सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय एका महिलेनं तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या केसमध्ये तरुणानं महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं. तर याचिक सुनावणी होत असताना उच्च न्यायालायनं असा निर्णय देऊन केस रद्द केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयानं ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला सहमती दर्शवत तरुणाला या प्रकरणातून मुक्त केलं आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेऊन त्याची सुटका कऱण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर शारीरिक संबंध दीर्घकाळ टिकला तर विवाहबंधनाचे आश्वासन शारीरिक संबंधांचा लोभ म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. मात्र पीडित महिला जेव्हा एका क्षणाला बळी पडते तेव्हा लग्नाची खोटी आश्वासने देऊन लैंगिक संबंध ठेवणे हा लोभ म्हणून म्हणता येईल असेही न्यायमूर्ती विभू बखरू म्हणाले.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Delhi, Marriage

    पुढील बातम्या