उत्तर ते दक्षिण भारतात वादळ आणि पावसाचं थैमान, देशभरात 14हून अधिक बळी

उत्तर ते दक्षिण भारतात वादळ आणि पावसाचं थैमान, देशभरात 14हून अधिक बळी

उत्तरप्रदेशात रविवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर 34 जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा येथील अतिवृष्टी आणि वीजांच्या कडकडाटामुळे 4 मुलांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

13 मे : उत्तरप्रदेशात रविवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर 34 जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा येथील अतिवृष्टी आणि वीजांच्या कडकडाटामुळे 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात अचानक वादळी वारे वाहण्यास सुरूवात झाली.

तब्बल 109 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वादळानं उत्तर प्रदेशात थैमान घातलंय. वादळामुळं दिल्ली विमानतळावरून उडणाऱ्या 70 विमानांची सेवा प्रभावित झाली आहे. तसंच दिल्ली मेट्रोची सेवा देखील विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं वाहनांचं नुकसान झालंय.

खराब हवामानामुळे इंदिरा गांधी विमानतळाची कमीतकमी 70 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर नोएडा-द्वारका मार्गावर मेट्रो रेल्वे अर्धा तास थांबवण्यात आली होती.

दरम्यान संध्याकाळी पुणे शहरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळायला सुरूवाती झाली. पुण्याच्या नानापेठ, सिंहगड रस्ता, रेल्वे स्टेशन परिसर, डेक्कन, सेनापती बापट रोड आणि कोथरूड, शिवाजी नगर आणि औंद या परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या.

 

काही ठिकाणी वीजांचा कडकडाटही पाहायला मिळाला तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. राजापूर, कुसमडी, नगरसुल गावात विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस झालाय. राजापूर गावात गारांसह पाऊस झालाय. आजच्या पावसानं उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत.

 

First published: May 13, 2018, 10:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading