बापरे! नदीत अर्धा डझन मृतदेह तरंगताना आढळले; स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

बापरे! नदीत अर्धा डझन मृतदेह तरंगताना आढळले; स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

मृतदेह नदीत तरंगतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच स्थानिक प्रशासनाच्या पथकाने संबंधित गावाला भेट देत चौकशी केली.

  • Share this:

भोपाळ, मध्यप्रदेश: काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमधील (Bihar) गंगा नदीत (Ganga River) अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले होते. यातील काही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूदर वाढल्याने स्मशानभूमीमध्ये मृतदेहांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचाच हा परिणाम असावा,अशी चर्चा असून त्यास ठोस दुजोरा मिळालेला नाही. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भितीचे वातावरण आहे. आता असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशातही (Madhya Pradesh) घडला आहे.

बिहार सरकारनेनुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, बक्सरमधील चौसा गावातील गंगा नदीत वाहत आलेले 71 मृतदेह (Dead Bodies) बाहेर काढून त्यांच्यावर कोरोना नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र ते मृतदेह कोरोनाग्रस्तांचे आहेत की नाही, याला शवविच्छेदनानंतरही दुजोरा मिळालेला नाही. मात्र या घटनेनंतर बिहार आणि उत्तरप्रदेश सरकारने एकमेकांवर दोषारोप केले आहेत. मोदी सरकार गंगा नदी स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असून अशा घटना स्विकारार्ह नाहीत, असे ट्विट  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करुन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केलं.

मात्र त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशात घडला आहे. मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रांज नदीत किमान अर्धा डझन मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, या नदीचे पाणी वापरावे का नाही असा संभ्रम त्यांच्या मनामध्ये आहे.

वाचा: 'मुसलमान नंतर आधी सरकारी कर्मचारी'; अतिक्रमणाविरोधी कारवाई थांबवण्याचा दबाव आल्यावर अधिकाऱ्याचं बाणेदार उत्तर

काही व्हायरल व्हिडीओंमध्ये (Viral Video) नांदापूर गावातील मुळची केन नदीची उपनदी असलेल्या रांज नदीत अर्धा डझन मृतदेह तरंगताना दिसत आहेत.

आम्ही या पाण्यात अंघोळ करतो. तसेच आमच्या गावातील हातपंपाचे पाणी बंद होते तेव्हा या नदीचे पाणी आम्ही पितो. ही नदी आमच्या जनावरांची तहान देखील भागवते. पण आता अशा प्रकारे पाणी दूषित झाल्याने आम्ही काय करावे,असा सवाल स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. आम्ही याबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला कळवले, परंतु अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही,असे ग्रामस्थांनी मिडीयाशी बोलताना सांगितले.

याबाबत पन्ना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मिश्रा म्हणाले,की या मृतदेहांपैकी एका 95 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आणि एका कर्करोगग्रस्त रुग्णाचा मृतदेह पारंपारिक विधीचा भाग म्हणून नदीत सोडण्यात आले. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून,त्यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

मृतदेह नदीत तरंगतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच स्थानिक प्रशासनाच्या पथकाने संबंधित गावाला भेट देत चौकशी केली.

First published: May 12, 2021, 11:47 PM IST

ताज्या बातम्या