'राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार',DMKच्या जाहीरनाम्यानं खळबळ

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 12:52 PM IST

'राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार',DMKच्या जाहीरनाम्यानं खळबळ

चेन्नई, 19 मार्च : तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेनं मंगळवारी (19 मार्च)लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. डीएमकेच्या जाहीरनाम्यामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. एकीकडे डीएमकेनं जाहीरनाम्याद्वारे मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचं धक्कादायक आश्वासनदेखील दिलं आहे. डीएमकेच्या जाहीरनाम्यातील या आश्वासनामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याव्यतिरिक्त नोटाबंदीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे.

डीएमकेनं यापूर्वीही अनेकदा राज्य सरकार आणि राज्यपालांकडे या प्रकरणातील आरोपींची सुटका करण्याची मागणी जाहीररित्या केली आहे. पण, आता पक्षाच्या जाहीरनाम्यातच राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचं थेट आश्वासन दिल्यानं दक्षिणेकडील राजकारणात वादविवाद सुरू झाले आहेत.

VIDEO: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांबाबत 'या' पक्षाच्या जाहीरनाम्यात धक्कादायक आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...