कॉंग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

कॉंग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

आज लोकसभेत बजेट सेशन दरम्यान ही कारवाई करण्य़ात आली

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मार्च : सभागृहात गोंधळ घातल्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या सात खासदारांना लोकसभेवरुन निलंबित केले. गौरव गोगोई, टीएन प्रतापन, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन आणि गुरजीत सिंह अशी निलंबन केलेल्या खासदारांची नावं आहेत. बजेट सेशन दरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी या काँग्रेसच्या सातही खासदारांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबन केलं आहे. आज सदनात दिल्ली हिंसाचाराबाबत चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांनी गोंधळ सुरू केला. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित केलं.

First published: March 5, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading