VIDEO अचानक पूर आल्याने नदीपात्रात अडकले 7 मजूर

मात्र पाणी जास्त वाढणार नाही असं वाटल्याने सर्व मजूरांनी आपलं काम सुरूच ठेवलं. नंतर पाण्याची पातळी अचानक वाढली आणि सर्व जण अडकून पडले.

News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2019 06:21 PM IST

VIDEO अचानक पूर आल्याने नदीपात्रात अडकले 7 मजूर

भोपाळ 30 जून : मध्य भारतात दमदार पावसाला सुरूवात झालीय. पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. अनेक कोरडी असणारी नदीपात्र आणि नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागलेत. मध्य प्रदेशात एका नदी पात्रात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी गेलेले 7 मजूर पुराच्या पाण्यात अडकून पडले. नंतर बचाव पथकाने  त्यांची सुटका केली. मात्र काही तास त्यांना आपला जीव मुठीत धरून राहावं लागलं.

मध्य प्रदेशातल्या बुऱ्हानपूर जिल्ह्यात एका नदीपात्रात पुलाचं बांधकाम सुरू होतं. नदीपात्रात फारसं पाणी नव्हतं. त्यामुळे काही बांधकाम सुरू होतं. त्यासाठी सात मजूर काम करत होते. सकाळी कामाला सुरूवात केल्यानंतर नदी पात्रातलं पाणी वाढायला लागलं. मात्र पाणी जास्त वाढणार नाही असं वाटल्याने सर्व मजूरांनी आपलं काम सुरूच ठेवलं.

नंतर पावसाचा जोर वाढला आणि नदीपात्रातल्या पाण्याची पातळी अचानक वाढली. पाण्याचा वेगही वाढला. नदी आधी ज्या भागातून वाहते  त्या भागात मुसळधार पाऊस झाल्याने या नदीतलं पाणी अचानक वाढलं. या सगळ्याचा अंदाज न आल्याने मजूरांना थरारक स्थितीला तोंड द्यावं लागलं. दुदैवाने पाण्याची पातळी आणखी वाढली नाही त्यामुळे सगळे मजूरांनी अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावर लोखंडी खांबांना उभे राहून आपला जीव वाचवला. नंतर गावकऱ्यांनी दोरांच्या साह्याने या सर्व मजुरांची सुखरुप सुटका केली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...