मुख्यमंत्र्यांच्या मुलीविरोधात 700 शेतकऱ्यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्र्यांच्या मुलीविरोधात 700 शेतकऱ्यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्र्यांच्या मुलीविरोधात 700 शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

  • Share this:

हैद्राबाद, 26 मार्च : एका पक्षाच्या उमेदवाराविरोधात दुसऱ्या पक्षाचा उमेदवार हे आत्तापर्यंतच राजकीय गणित. पण, तेलंगनामध्ये मात्र वेगळंच चित्र पाहयाला मिळालं. तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपली मुलगी कलवकुंतला कविताला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण, यावेळी त्यांना वेगळ्याच धक्क्याचा सामना करावा लागला. कारण, कलवकुंतला कविता विरोधात तब्बल 700 शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये हळद आणि ज्वारी उत्पादन करणारे जवळपास 200 शेतकरी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कलवकुंतला कविता यांनी 'शेतकऱ्यांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करा. त्यामुळे त्यांना तुमच्या समस्यांची जाणीव त्यांना होईल' असं आवाहन केलं होतं. पण, त्यांचं हे आवाहन त्यांच्याविरोधात उलटलं असून तब्बल 700 शेतकऱ्यांनी कलवकुंतला कविताविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .

उत्तर प्रदेशनंतर प्रियंका गांधींचं टार्गेट महाराष्ट्र, असा असेल नवा प्लॅन!

का भरला उमेदवारी अर्ज

दरम्यान, 700 शेतकऱ्यांनी कलवकुंतला कविता विरोधात उमेदवारी अर्ज का दाखल केले? असा सवाल केला असता शेतकरी नेत्यानं  आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहोत. सध्या आम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे याची जाणीव या नेत्यांना व्हावी म्हणून 700 शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया दिली. यापूर्वी जळपास 1000 शेतकऱ्यांनी कलवकुंतला कविता विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली होती.

यापूर्वी शेतकऱ्यांनी हळद आणि ज्वारीच्या मुद्यावरून राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांनी हळदीकरता 3,500 आणि ज्वारी करता 15,000 प्रति क्विंटल दर देण्याची मागणी केली होती.

दरम्यान, शेतकरी आता अर्ज मागे घेणार की नाही? हे देखील पाहावं लागणार आहे.

VIDEO: भाजप प्रवेशानंतर जयाप्रदांची पहिली प्रतिक्रिया..

First published: March 26, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading