अधिकाऱ्याचा जुगाड, मोलकरीण झाली करोडपती

अधिकाऱ्याचा जुगाड, मोलकरीण झाली करोडपती

मोलकरणीच्या खात्यावर अवघे 700 रूपये होते. पण, 32 महिन्यामध्ये हीच रक्कम 75 लाख झाली.

  • Share this:

चेन्नई, 30 मे : चेन्नईमधील एका घटनेनं आता सीबीआय देखील चक्रावून गेली आहे. कारण, घरकाम करणाऱ्या सरिता नावाच्या मोलकरणीच्या बँक खात्यावर केवळ 700 रूपये होते. पण, अवघ्या 32 महिन्यात ही रक्कम 75 लाख रूपये झाली. या साऱ्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. सीबीआयला देखील 700 रूपयाचे 75 लाख झाले कसे? हे कोडं उलगडलेलं नाही. त्यामुळे सरिताच्या बँक खात्याची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ज्या सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी सरिता काम करत होती तो अधिकारी पेट्रोलियम खात्यात मोठ्या पदावर काम करत होता. 32 महिन्यांपूर्वी सरिता या ठिकाणी काम करायला आली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरिता ज्या अधिकाऱ्याच्या घरी काम करत आहे त्याच्याविरोधात चौकशी सुरू आहे. कमाईपेक्षा जास्त संपत्ती सापडल्यानं ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. ऑगस्ट 2015 ते एप्रिल 2018 पर्यंत संबंधित अधिकारी हा चेन्नईमध्ये होता. चौकशी अंती अनेक धक्क्दायक खुलासे देखील होत आहेत.

सरिताच्या नावावर 1.37 कोटींची संपत्ती असल्याचं सीबीआय तपासातून स्पष्ट झालं आहे. तर, सरिताच्या बँक खात्यात 75 लाख रूपय देखील याच अधिकाऱ्यानं जमा केल्याची माहिती आता समोर येत आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तपास अधिक जोरानं करण्यात येत आहे. शिवाय, पुरावे गोळा करण्यामध्ये देखील पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.


VIDEO: बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या चोराला महिलेचा हिसका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: money
First Published: May 30, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या