Home /News /national /

कर्मा दल विसर्जनादरम्यान 7 मुलींचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

कर्मा दल विसर्जनादरम्यान 7 मुलींचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

7 मुलींचा बुडून (Drowning) मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    झारखंड, 18 सप्टेंबर: झारखंडच्या (Jharkhand) लातेहारमध्ये (latehar) मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बालूमाथमध्ये कर्मा विसर्जनादरम्यान 7 मुलींचा बुडून (Drowning) मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटना बालूमाथ पोलीस स्टेशन परिसरातील शेरेगडा गावातील मननडीह टोला येथील आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कर्मा दल विसर्जनादरम्यान 7 मुलींचा बुडून मृत्यू झाला. मृत मुलींचं वय 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच बालूमाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय?, पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट  मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी तीन मुली सख्ख्या बहिणी होत्या. मननडीह टोला येथील रहिवासी अकलू गंझू याच्या मुली होत्या. तर मृत सातही मुली शेरेगडा गावातील मननडीह टोला येथील रहिवासी होत्या. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली तोरी-बाळूमठ-शिवपूर रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात कर्म दल विसर्जनासाठी गेल्या होत्या. या दरम्यान ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले आणि मुलींना बाहेर काढले. मात्र 4 मुलींचा आधीच मृत्यू झाला होता. विराटच्या निर्णयावर टीम इंडियातून प्रतिक्रिया, कॅप्टनपदी कायम राहण्याची सहकाऱ्याची मागणी मृत मुलींची नावं रेखा कुमारी - 18 वर्ष लक्ष्मी कुमारी- 8 वर्ष रिना कुमारी- 11 वर्ष मीना कुमारी- 8 वर्ष पिंकी कुमारी- 15 वर्ष सुषमा कुमारी- 7 वर्ष सुनिता कुमारी- 17 वर्ष
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jharkhand

    पुढील बातम्या