कृपास्वामी मंदिरात चेंगराचेंगरी..चार महिलांसह सात भाविक ठार, १० जण जखमी

कृपास्वामी मंदिरात पाडी कासू पंरपरेनुसार आजच्या दिवशी मंदिराच्या पुजाऱ्याकडून भक्तांना मंदिरातील दानपेटीतून रुपयाचे नाणे दिले जाते. हे नाणे घरी नेल्यानंतर भरभराट होते, असे मानले जाते.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 06:36 PM IST

कृपास्वामी मंदिरात चेंगराचेंगरी..चार महिलांसह सात भाविक ठार,  १० जण जखमी

त्रिची, 21 एप्रिल- तामिळनाडूमधील त्रिची येथील एका मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यु झाला तर १० जण गंभीर जखमी झाले. थुरायवूर येथील शासकीय रुग्णालयात  जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. मुत्थायमपलायम गावातील कृपास्वामी मंदिरात ही घटना घडली. मुत्थायमपलायम गावातील कृपास्वामी मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

कृपास्वामी मंदिरात पाडी कासू पंरपरेनुसार आजच्या दिवशी मंदिराच्या पुजाऱ्याकडून भक्तांना मंदिरातील दानपेटीतून रुपयाचे नाणे दिले जाते. हे नाणे घरी नेल्यानंतर भरभराट होते, असे मानले जाते. पुजाऱ्याकडून या नाणे वाटपादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. शेकडो भाविकांनी एकच गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्रिची या नावाने प्रसिध्द असलेले तिरुचिरापल्ली हे तमिळनाडूमधील चौथे सर्वात मोठे शहर आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...