2025 पर्यंत गमवाव्या लागणार सात कोटी नोकऱ्या? तुमची नोकरी राहणार का सुरक्षित?

2025 पर्यंत गमवाव्या लागणार सात कोटी नोकऱ्या? तुमची नोकरी राहणार का सुरक्षित?

AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स' मुळे जगभरातल्या सात कोटींपेक्षा जास्त जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील असा अहवाल एका विख्यात जागतिक संस्थेने दिला आहे

  • Share this:

मुंबई, ता. 19 सप्टेंबर : जगभरच नोकऱ्यांची कमतरता असताना तंत्रज्ञानाच्या नवं नव्या अविष्कारामुळे जगावर एक नवीन संकट येवू घातलंय. हे नवं संकट आहे नोकऱ्या जाण्याचं. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स' मुळे जगभरातल्या सात कोटींपेक्षा जास्त जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील असा अहवाल एका विख्यात जागतिक संस्थेने दिला आहे. सध्या माणसं करू शकतील अशी असंख्य कामं मशिन्सच्या माध्यमातून होणार असून कोट्यवधी लोकांना बेरोजगार व्हावं लागणार आहे. ड्रायव्हर, डाटाएंट्री पासून ते रिसेप्शन आणि शॉपिंगसारखी असंख्य कामं ही आता मशिन्सच्या माध्यमातूनच होणार आहेत. मशिन्समुळं चुकांची शक्यताही खुपच कमी राहते आणि उत्पादकताही वाढते. त्यामुळं फक्त काही किरकोळ कामच नाही तर उच्च दर्जाची कामही याच मशिन्सच्या माध्यमातून होणार आहेत.

या क्षेत्रात गमवाव्या लागतील नोकऱ्या

या अहवालानुसार पुढच्या सात वर्षांमध्ये माणसांची अर्ध्यापेक्षा जास्त कामं (अंदाजे 52 टक्के) मशिन्स करणार आहे. सध्या माणसांच्या एकूण कामांपैकी 29 टक्के कामं मशिन्सच्या माध्यमातून होत आहेत. डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, टेक्नेशियन्स, व्हेंडर्स, ऑपरेटर्स, विश्लेषण करणारे तज्ज्ञ, व्हिडीओ एडीटर्स, कॅमेरामन्स अशा असंख्य क्षेत्रांमध्ये नोकरी जाण्याचा मोठा धोका आहे.

माणसांना द्यावे लागणारे पगार, दरवर्षी त्यात करावी लगाणारी वाढ, त्यांना द्याव्या लागणाऱ्या सेवा, सुविधा अशा असंख्य गोष्टींपासून मालकांची सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांचा कल हा मशिन्स घेण्याकडेच राहणार आहे.

संकटातल्या नव्या संधी

पुढच्या सात वर्षांमध्ये नोकऱ्या गमावण्याचं हे संकट उभं असतानाच आशेचा नवा किरणही आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने तयार केलेल्या अहवालात मात्र सकारात्मक निरिक्षण नोंदवण्यात आलंय. AI मुळे जेवढ्या नोकऱ्या जातील त्यापेक्षा जास्त म्हणजे 6 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होतील असं म्हटलं आहे. मात्र या संधी मिळवण्यासाठी नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. म्हणजेच किमा 13 कोटी नव्या संधी निर्माण होतील असंही त्या अहवालत म्हटलं आहे.

या क्षेत्रात असतील नव्या संधी

हा अहवाल विविध 12 उद्योगांमधल्या दिड कोटी लोकांचा आणि त्यांच्या कामाचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. ही चौथी औद्यागिक क्रांती असून त्यासाठी सरकारं किंवा उद्योग अजुनही तयार नाहीत असं निरिक्षणही या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. वेब आणि सॉफ्टवेयर डेव्हलपर्स, ई कॉमर्स आणि सोशल मीडिया तज्ज्ञ अशा लोकांना सर्वाधिक संधी असतील.

सॉफ्टवेयर इंजिनियर्सनाही चांगले दिवस येणार आहेत. ज्या नविन मशिन्स येणार आहेत त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रिसाठी नव्या दमाच्या तरूणांना संधी असणार आहे. त्याचबरोबर त्या मशिन्स चालविण्याचं प्रशिक्षण आणि मेंटन्ससाठीही मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून जे उद्योग किंवा क्षेत्र बदलतील तेच टिकून राहतील. जे बदलणार नाही ते संपून जातील हाच या अहवालाचा सारांश आहे.

तरूणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसीड, बघा LIVE व्हिडिओ

First published: September 20, 2018, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading