पी.चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीनाबाबत हायकोर्टाचा निर्णय बदलण्यास नकार

पी.चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीनाबाबत हायकोर्टाचा निर्णय बदलण्यास नकार

INX Media Case : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार (INX Media) प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर :  आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार (INX Media)  प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे आता ईडीकडून त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते. आज दुपारपर्यंत चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिदंबरम यांच्याविरोधात ठोस पुराव असल्याचा दावा ईडीनं केला आहे.

दिल्ली हायकोर्टानं अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर चिदंबरम यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण सुप्रीम कोर्टानंही त्यांना दणकाच दिला आहे.

सुनावणीदरम्यान कोर्टानं सांगितलं की, 'या प्रकरणात अटकपूर्व जामीन दिल्यास तपासात अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे अर्जास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. शिवाय, ईडीजवळ जे काही पर्याप्त कागदपत्रं आहेत ती चिदंबरम यांना दाखवणं आवश्यक नाही. तसंच या प्रकरणाच्या चौकशीसाठी तपास यंत्रणेला पुरेसे स्वातंत्र्य दिले जावे.

(वाचा : खूशखबर! 4 दिवसांनी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर)

(वाचा : विधानसभेसाठी शिवसेनेला 'इतक्या' जागा देण्यास भाजप तयार)

(वाचा : शरद पवारांच्या मुद्यावरून रोहितच्या पाठीशी शिवसेना, उद्धव ठाकरे म्हणतात...)

ईडीकडे आहेत पुरावे

चिदंबरम यांच्याविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे असल्याचा दावा सीबीआय आणि ईडीनं कोर्टात केला आहे. ईडीनुसार पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या 17 बँक खात्यांची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांना 21  ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमय घडामोडीनंतर अटक केली होती. अटकेच्या कारवाईपासून पी. चिदंबरम जामीनासाठी प्रचंड प्रयत्न करत होत, पण अर्ज फेटाळल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत.

काय आहे हे प्रकरण?

15 मार्च 2007 रोजी INX Mediaने FIPBच्या मंजूरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे अर्ज केला होता. FIPBने 18 मे 2017 रोजी शिफारस केली होती. पण बोर्डाने INX Mediaद्वारे INX न्यूजमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूकीचे परवानगी दिली नाही. सीबीआयच्या मते INX Mediaने नियमांचे उल्लंघन करून जाणिपूर्वक INX न्यूजमध्ये 26 टक्के गुंतवणूक केली. इतक नव्हे तर 800 रुपये प्रती शेअर या हिशोबाने 305 कोटी गोळा केले. पण प्रत्यक्षात त्यांना 4.62 कोटी रुपयांच्या FDIची परवानगी होती.

VIDEO: शिवसेना 50- 50च्या फॉर्म्युल्यावर ठाम? संजय राऊत म्हणतात...

Published by: Akshay Shitole
First published: September 5, 2019, 11:47 AM IST

ताज्या बातम्या