कर्नाटकातील डाव भाजपवरच उलटणार? काँग्रेसच्या खेळीने पुन्हा नवं वळण

कर्नाटकातील डाव भाजपवरच उलटणार? काँग्रेसच्या खेळीने पुन्हा नवं वळण

भाजपने काँग्रेसला धक्का देत काही आमदार आपल्याकडे खेचले. पण आता रिव्हर्स मिशनमुळे भाजपच अडचणीत आली आहे.

  • Share this:

बंगळुरू, 13 जुलै : कर्नाटकात काठावर बहुमत असलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारवर गेल्या काही दिवसांपासून टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आता काँग्रेसच्या एका खेळीनं भाजपला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपमधील तब्बल 7 आमदार काँग्रेस-जेडीएसच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपने काँग्रेसला धक्का देत काही आमदार आपल्याकडे खेचले. पण आता रिव्हर्स मिशनमुळे भाजपच अडचणीत आली आहे. काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असणारे डीके शिवकुमार सरकार कर्नाटकातील सरकार टिकवणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक

भाजपमधील 7 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. भाजपचे सर्व 105 आमदार सध्या रिसॉर्टमध्ये आहेत. पण विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपचे काही आमदार काँग्रेस-जेडीएस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आमदारांना मंत्रिपदासह तगड्या ऑफर्स देण्याची काँग्रेसची तयारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपने सरकारविरोधात केलेली रणनीती अयशस्वी होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

काय होती भाजपची खेळी?

कर्नाटक सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपने राजकीय खेळी केली. त्यानंतर दोन अपक्ष आमदारांनी काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत राजीनामे दिले. एच. नागेश आणि आर. शंकर हे राजीनाम्यानंतर राज्यपालांना भेटले आणि त्यांनी आपला पाठिंबा भाजपला असल्याचं त्यांना सांगितलं.

2018मध्ये काँग्रेस – जेडीएसनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर अवघ्या 13 महिन्यात आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार अस्थिर झालं. या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. पण, आपल्या राजीनाम्यावर मात्र 14 आमदार ठाम आहेत. पण, विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारले नाहीत.

SPECIAL REPORT : सुनेसाठी सासरच्यांची दंगल, पत्नीला परत आणण्यासाठी पतीचे आंदोलन

First published: July 13, 2019, 9:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading