Home /News /national /

निर्भया बलात्कार प्रकरण: नराधमांविरुद्ध डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

निर्भया बलात्कार प्रकरण: नराधमांविरुद्ध डेथ वॉरंट देणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

nirbhaya

nirbhaya

निर्भया प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना डेथ वॉरंट जारी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा (Satish Kumar Arora) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. न्य़ायाधीश अरोरा यांना एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीच्या आधारावर अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले आहे. न्यायाधीश सतीश अरोरा यांनी दिल्लीत 2012 साली झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील गुन्हेगारांविरोधात काही दिवसांपूर्वी डेथ वॉरंट जारी केले होते. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी काल गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील गुन्हेगार मुकेश कुमार यांचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर अखेर आता दोषींना फाशी देण्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या 4 आरोपींना फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणात सर्व आरोपींची दया याचिका फेटाळल्यानंतर अखेर सत्र न्यायालयाने दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता नराधमांना फाशी देण्यात येणार आहे. आता आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House court) नवीन तारीख जाहीर केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार हे अरोरा खटल्यातील दोषी मुकेश कुमार सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करीत होते आणि फाशीची तारीख 22 जानेवारीपासून पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करीत होते. यापूर्वी, तिहार जेल अधिकाऱ्यांनी निर्भया प्रकरणातील चार दोषींवर फाशीची शिक्षा परत देण्याची मागणी दिल्ली कोर्टाकडे केली होती. दोषींवर कोणते पर्याय शिल्लक आहेत मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींकडून फेटाळल्यानंतर त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. अक्षय आणि पवन या दोन दोषींना अजूनही क्यूरेटिव्ह  याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. अक्षय, पवन आणि विनयकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा घटनात्मक पर्याय आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nirbhaya gang rape case

    पुढील बातम्या