मराठी बातम्या /बातम्या /देश /BREAKING: अखेर संजीवनी मिळणार! भारतात कोरोना लशीला सशर्त मंजुरी!

BREAKING: अखेर संजीवनी मिळणार! भारतात कोरोना लशीला सशर्त मंजुरी!

भारतासाठी संजीवनी  ठरू शकेल अशी बातमी नववर्षाच्या पहिल्या दिवशीच आली आहे.

भारतासाठी संजीवनी ठरू शकेल अशी बातमी नववर्षाच्या पहिल्या दिवशीच आली आहे.

भारतासाठी संजीवनी ठरू शकेल अशी बातमी नववर्षाच्या पहिल्या दिवशीच आली आहे.

    नवी दिल्ली, 1 जानेवारी: कधी येणार याची प्रतीक्षा असलेली कोरोना लस(Corona Vaccine)अखेर भारतात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतासाठी ही दिलासा देणारी बातमी आली आहे.

    Oxford-AstraZeneca Vaccine ची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. लशीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड (Oxford-AstraZeneca Covishield Vaccine) लशीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं सांगितलं आहे. आता औषध नियंत्रक महासंचालकांनी लशीसाठी परवानगी दिली की, सर्वसामान्यांसाठी ही लस लवकरच उपलब्ध होऊ शकेल. औषध महानियंत्रकही Corona Vaccine ला परवानगी देतील. एकदा Central Drugs Standard Control Organization (CDSCO) ने परवानगी दिली की भारतात कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल. या कोरोना लशीच्या व्यावसायिक उपयोगाला पूर्वपरवानगी असेल तरच (conditional marketing authorisation) मान्यता देण्यात आली आहे.

    भारतातले सर्वात मोठे लसउत्पादक असणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला (adar poonawalla serum institute of india ) यांनी आपल्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डोस तयार असतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

    ही लस कोणी विकसित केली आहे?

    ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या दी जेनर इन्स्टिट्यूट (The Jenner Institute) या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्वीडिश कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारी करून ही लस विकसित केली आहे. ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी या लशीची जागतिक पातळीवरील निर्मिती आणि वितरणासाठी करार केल्याचं 30 एप्रिल रोजी जाहीर केलं.

    भारतातले सर्वात मोठे लसउत्पादक असणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला (adar poonawalla serum institute of india ) यांनी आपल्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डोस तयार असतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Breaking News, Corona vaccine, Coronavirus