कोरोना लशीच्या वादावर अखेर आदर पूनावाला यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले...

कोरोना लशीच्या वादावर अखेर आदर पूनावाला यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले...

कोविड-19 लस उत्पादकांना सरकारने दिलेल्या ऑर्डरबाबत परस्परविरोधी अहवाल आणि वादारम्यान त्यांनी सोमवारी कंपनीला 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असल्याचं सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे: सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड लशीची निर्मिती केली जात आहे. लशीच्या निर्मितीबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोविड-19 लस उत्पादकांना सरकारने दिलेल्या ऑर्डरबाबत परस्परविरोधी अहवाल आणि वादारम्यान त्यांनी सोमवारी कंपनीला 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असल्याचं सांगितलं आहे.

'आम्हाला आतापर्यंत 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असून त्यापैकी 15 कोटीहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत. भारत सरकारकडून पुढील काही महिन्यात 11 कोटी डोससाठी 1,732.50 कोटी रुपयांची 100 टक्के आगाऊ रक्कमही मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 11 कोटी डोस राज्य आणि खासगी रुग्णांलयात पुरवण्यात येतील' अशी माहिती पूनावाला यांनी एका निवेदनात दिली.

'लशीचं उत्पादन करणं ही एक विशेष प्रक्रिया आहे, त्यामुळे एका रात्रीत उत्पादन वाढणं शक्य नाही. तसंच भारताची लोकसंख्याही मोठी आहे. सर्व लोकांसाठी पुरेसे डोस तयार करणं सोपं काम नाही. तुलनेने कमी लोकसंख्या असलेले अगदी मोठे प्रगत देश आणि कंपन्याही यासाठी संघर्ष करत असल्याचं', आदर पूनावाला यांनी सांगितलं.

(वाचा - Good News मुंबई 1 जूनपासून येऊ शकते रुळावर, 1 जुलैपासून शाळाही शक्य पण...)

(वाचा - महाराष्ट्राबाबत टेन्शन थोडं कमी; केंद्रीय मंत्रालयाने दिली महत्त्वाची बातमी)

दरम्यान, जगभरातली सगळ्यात मोठी लस बनवणारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांना धमक्या मिळत असल्याचा गंभीर खुलासा केलेला होता. आदर पूनावाला हे सध्या इंग्लंडमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. देशात कोरोनाच्या लशींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आपल्यावर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचं पुनावाला यांनी लंडनमध्ये एका मुलाखतीत सांगितलं.

आदर पूनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोरोना लसीचं उत्पादन पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. याबाबतीत जे काही शक्य असेल ते करणार असल्याचंही ते म्हणाले.

Published by: Karishma Bhurke
First published: May 3, 2021, 5:28 PM IST

ताज्या बातम्या