मराठी बातम्या /बातम्या /देश /

'सीरम' प्रमुख अदर पुनावाला म्हणतात 'मी पुन्हा येईन'; धमकी देणाऱ्यांना सूचक इशारा?

'सीरम' प्रमुख अदर पुनावाला म्हणतात 'मी पुन्हा येईन'; धमकी देणाऱ्यांना सूचक इशारा?

Adar Poonawalla: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांना काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 2 मे: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी एक ट्विट करत कोविशिल्ड लस (Covishield Vaccine) उत्पादनाविषयी माहिती दिली आहे. पुण्यात कोविशिल्ड लसीचं उत्पादन मोठ्या वेगात सुरू आहे आणि मी लवकरच भारतात (India) परत येईन असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अदर पुनावाला हे लंडनमध्ये आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीनंतर एकच खळबळ उडाली. कारण, देशातील शक्तीशाली लोकांचे धमकीचे फोन आल्याचं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे पुढील काही दिवस ते लंडनमध्येच राहणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अदर पुनावाला यांनी एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये त्यांनी भारतात परण्याबाबत माहिती दिली आहे. अदर पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "ब्रिटनमध्ये आमच्या सर्व भागधारकांसोबत बैठक झाली. पुण्यात कोविशिल्ड लसीचं उत्पादन खूपच वेगाने सुरू आहे. मी काही दिवसांत भारतात परत येईन आणि लस निर्मितीचा आढावा घेण्यास उत्सुक आहे." सर्व ओझं माझ्या खांद्यांवर आलं, मी एकटा काय करणार? अदर पुनावालांच्या भावनांचा स्फोट आपल्याला धमकीचे फोन आल्याचं अदर पुनावाला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारकडून अदर पुनावाला यांना Y दर्जाची सुरक्षाही देण्यात आली. सध्या अदर पुनावाला हे लंडनमध्ये आपल्या परिवारासोबत आहेत. कोविशिल्ड लसीची मागणी खूपच वाढली आहे आणि त्यामुळे निर्मितीसाठी प्रचंड दबाव आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, अदर पुनावाला यांना सीआरपीएफकडून Y दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. Y दर्जाच्या सुरक्षेत 11 जवान असतात ज्यामध्ये एक किंवा दोन कमांडोज आणि पोलीस कर्मचारी सहभागी असतात. अदर पुनावाला यांना ही सुरक्षा संपूर्ण देशभरात देण्यात आली आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Pune

पुढील बातम्या