Home /News /national /

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांचं निधन

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांचं निधन

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून डी.पी. त्रिपाठी यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम केलं.

    नवी दिल्ली, 2 जानेवारी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी.पी. त्रिपाठी यांचं निधन झालं आहे. डी.पी. त्रिपाठी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी दिल्ली इथं अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून डी.पी. त्रिपाठी यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम केलं. राष्ट्रीय स्तरावर आक्रमकपणे कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या काही मोजक्या नेत्यांमध्ये डी. पी. त्रिपाठी यांचं नाव घेतलं जात असे. त्रिपाठी यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 'डी. पी. त्रिपाठीजी यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठं दु:ख झालं. ते राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस होते. तसंच आम्हा सर्वांसाठी ते मार्गदर्शक होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून डीपी त्रिपाठीजी आम्हाला करत असलेल्या मार्गदर्शनाला आम्ही आता मूकणार आहोत,' अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: D P tripathi, NCP

    पुढील बातम्या