ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या

गौरी लंकेश यांच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

  • Share this:

05 सप्टेंबर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडलीये.

मिळालेल्या माहितीनुसार,  बंगळुरूच्या राजा राजेश्वरी नगरमध्ये त्यांचं घर आहे. त्या आपल्या गाडीतून उतरत होत्या आणि बंगल्याचं गेट उघडत होत्या. तेवढ्यात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर 6 गोल्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली, तर 2 गोळ्या छातीत लागल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गौरी लंकेश ह्या माजी पत्रकार आणि लेखक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. त्यांनी कर्नाटकमध्ये विविध दैनिकात लिखान केलंय. तसंच गौरी लंकेश पत्रिके नावाचं मासिक चालवायच्या. त्या या मासिकाच्या संपादिका होत्या. उजव्या राजकारण्यांविरोधात त्यांचं बरंच लिखाण आहे.

बंगळूर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 10:09 PM IST

ताज्या बातम्या