गौरी लंकेश खून प्रकरणाचं सिंधुदुर्ग कनेक्शन, संशयित आरोपी सनातनचा साधक

गौरी लंकेश खून प्रकरणाचं सिंधुदुर्ग कनेक्शन, संशयित आरोपी सनातनचा साधक

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश खून प्रकरणातील मुख्य आरोपी के. टी. नवीनकुमार व्यतिरिक्त अमित डेगवेकरसह चौघांना अटक करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, ता. 02 मे : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका गौरी लंकेश खून प्रकरणातील मुख्य आरोपी के. टी. नवीनकुमार व्यतिरिक्त अमित डेगवेकरसह चौघांना अटक करण्यात आली. या चौघांपैकी एका आरोपीकडून तब्बल ७४ सिमकार्ड, २२ फोन आणि डायरी जप्त करण्यात आली आहे. त्यातला आरोपी अमोल काळे हा महाराष्ट्रातील चिंचवडचा रहिवासी आहे.

अमोल काळे महाराष्ट्र आणि गोव्यात शाखा असणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या संघटनेसाठी तो कार्यरत होता. या डायरीत डाव्या विचारसणीच्या ७ जणांचे नावं आणि पत्ते आहेत. याबाबत एसआयटी अधिक तपास करत आहे.

सिंधुदुर्गच्या अमित डेगवेकरसह, मनोहर येडवे (वय 30, विजापूर कर्नाटक), सुजितकुमार ऊर्फ प्रवीण (37, मंगळूर), अमोल काळे ऊर्फ भाईसाब (40, महाराष्ट्र) आणि अशी या चार संशयितांची नावं आहेत. हे सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत. या चौघांना अटक करून कर्नाटक पोलिसांनी बंगलोर कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे.

First published: June 2, 2018, 4:13 PM IST

ताज्या बातम्या