पहिल्या पत्नीसोबत काडीमोड, आता दुसरं लग्न करतायत वकील हरीश साळवे

पहिल्या पत्नीसोबत काडीमोड, आता दुसरं लग्न करतायत वकील हरीश साळवे

प्रसिद्ध वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे पुन्हा एकदा लग्न करत असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : प्रसिद्ध वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे पुन्हा एकदा लग्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. मीनाक्षी साळवे यांच्याशी काडीमोड घेऊन पुन्हा एकदा नवा संसार थाटणार आहेत. हरीश साळवे आपली मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसार्ड यांच्याशी लंडनच्या चर्चमध्ये 28 ऑक्टोबरला लग्न करणार आहेत.

कॅरोलीनशी लग्न करण्यापूर्वी हरीश साळवे यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. हरीश आणि कॅरोलीनला लग्नाआधी मुलेही होती. कॅरोलीन व्यवसायाने एक कलाकार आहे आणि तिला एक मुलगी आहे. माहितीनुसार, हरीश साळवे यांची कला प्रदर्शनात कॅरोलिनशी भेट झाली. यानंतर दोघांचेही मित्र झाले आणि त्यानंतर त्यांच्यातलं नातं वाढत गेलं.

2019 साली आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची भारताच्या वतीने बाजू देखील मांडली होती. या प्रकरणात पाकिस्तानला त्यांनी तोंडघाशी पाडलं होतं शिवाय यासाठी जास्त फी देखील घेतली नव्हती.

हे वाचा-अँड्रॉईड युजर्सला या 21 apps बद्दल इशारा, फोनसाठी ठरू शकतील धोकादायक

हरीश साळवे हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी अनेक खटले चालवण्यात त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. सलमान खानची हिट अॅण्ड रन केस असो की वोडाफोनची किंवा आयटीसी हॉटेल हरीश साळवे यांनी खटला चालवला आहे. मुळचे नागपुरात वाढलेले हरीश साळवे 1976 मध्ये दिल्लीत आले. साळवे 2002 पर्यंत सॉलिसिटर जनरल राहिले. 2003 मध्ये, साळवे यांना आंतरराष्ट्रीय बाबींसाठी लॉबिंग सुरू केले. सध्या ते लंडनमध्ये राहात असून 28 ऑक्टोबरला त्यांच्या मैत्रिणीसोबत लग्न करणार आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 26, 2020, 3:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या