मराठी बातम्या /बातम्या /देश /

Shocking : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलीचा रस्ते अपघातात मृत्यू; कार डिव्हायडरला धडकली अन्...

Shocking : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलीचा रस्ते अपघातात मृत्यू; कार डिव्हायडरला धडकली अन्...

तानिया अवघ्या 25 वर्षांची होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

तानिया अवघ्या 25 वर्षांची होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

तानिया अवघ्या 25 वर्षांची होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

हैद्राबाद, 1 ऑगस्ट : तेलंगणामध्ये रंगा रेड्डी जिल्ह्यात रस्ते अपघातात काँग्रेस नेत्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातादरम्यान कारमधील दोघेजणं बचावले. पोलिसांनी या प्रकरणात केस दाखल करून तपास सुरू केला आहे.

ही घटना रंगा रेडी जिल्ह्यातील राजेंद्रनगर भागातील आहे. येथे काँग्रेस नेता फिरोज खान यांची मुलगी तानिया काकडे (25) शमशाबाद एअरपोर्ट रोडवर आपल्या आय-20 कारने प्रवास करीत होती. यादरम्यान झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, तिची कार एका डिवायडरला धडकली आणि पलटली. यावेळी कारमध्ये आणखी दोघेजणं होते. ते सुरक्षित आहेत.

शमशाबादचे एसीपी यांनी सांगितलं की, सोमवारी साधारण  वाजता हा अपघात घडला. या अपघातात तानिया नावाच्या तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. चालकाचे नाव अली मिर्झा असून अपघातावेळी कारमध्ये दीया नावाची तरुणीदेखील होतीय दोघांना खरचटलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

First published:

Tags: Crime news, Road accident, Telangana, काँग्रेस