काँग्रेसचे नेते अहमद पटेल ईडीच्या रडारवर, 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, त्यांचा मुलगा फैसल आणि जावाई इरफान सिद्दिकी ईडीच्या रडारवर आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2017 09:41 PM IST

काँग्रेसचे नेते अहमद पटेल ईडीच्या रडारवर, 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका

29 डिसेंबर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, त्यांचा मुलगा फैसल आणि जावाई इरफान सिद्दिकी ईडीच्या रडारवर आहे. एका कंपनीसाठी 500 कोटी फसपवणुकीचा आरोप अहमद पटेल यांच्यावर करण्यात आलाय. ईडीने या प्रकरणी फैसल आणि इरफान सिद्दिकीची चौकशी सुरू केलीये.

अहमद पटेल हे काँग्रेसचे गुजरातमधून राज्यसभेचे खासदार आहे. अहमद पटेल 19 वर्ष माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार राहिले. अहमद पटेल यांचा गांधी घराण्याशी जवळचा संबंध आहे. अशाच त्यांचा 500 कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुलगा आणि जावायांचं नाव पुढे आलंय. त्यामुळे अहमद पटेल अडचणीत सापडले आहे.

गुजरात निवडणुकीमध्ये अहमद पटेल चर्चेत राहिले होते. अंकलेश्वरमधील सरदार पटेल रुग्णालय प्रकरण समोर आलं होतं. या रुग्णालयाच्या संचालकपदी अहमद पटेल होते. गुजरात एटीएसने भरूच इथून  दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. यातला एक दहशतवादी याच हाॅस्पिटलमध्ये काम करत होता. या प्रकरणानंतर अहमद पटेल यांना संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 09:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...