काँग्रेसचा चाणक्य हरपला, अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचा चाणक्य हरपला, अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

अहमद पटेल यांना मागील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण (Ahmed Patel COVID Infected)  झाली होती. त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल (Faisal Patel)याने वडिलांचे दु:ख निधन झाले आहे, अशी माहिती दिली.गुजरातचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचं पहाटे 3.30 वाजता निधन झाले अशी माहिती दिली.

'माझ्या वडिलांना महिन्याभराआधी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यामुळे त्यांचे निधन झाले', अशी दु:खद माहिती फैसल पटेल यांनी दिली.

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना 15 नोव्हेंबर रोजी गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 1 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते.

अहमद पटेल हे आठ वेळा संसदेचे सदस्य राहिले. तीन वेळा ते लोकसभा आणि पाच वर्ष ते राज्यसभेत होते. ऑगस्ट 2018 मध्ये आखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) च्या कोषाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती.

अहमद पटेल यांनी 1976 साली गुजरातमधील भरूच जिल्ह्यात  स्थानिक निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर गुजरात आणि केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाची संघटनात्मक वाढ होण्यासाठी काम पाहिले.

1985 मध्ये  तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर

अहमद पटेल यांनी सरदार सरोवर योजनेची पाहणी करण्यासाठी  नर्मदा प्रबंधन प्राधिकरण स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अहमद पटेल यांचा अल्पपरिचय

- जन्म - 21 ऑगस्ट 1949 (भरूच, गुजरात)

- 1976मध्ये पालिका निवडणुकीपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात

- 1977 साली पहिल्यांदा खासदारपदी निवड

- 1985 - राजीव गांधींचे संसदीय सचिव म्हणून नियुक्ती

- एकूण 8 वेळा खासदार (3 लोकसभा, 5 राज्यसभा)

- काँग्रेसचे प्रमुख संकटमोचक म्हणून ओळख

- सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार

- 2004 साली सत्ता येऊनही मंत्रिपद घेतलं नाही

- पडद्यामागे काम करण्यास अधिक पसंती

- 2004-14 या काळात पक्ष आणि सरकारमधील महत्वाचा दुवा

- घटकपक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी

- कुटुंब - पत्नी, एक मुलगी, एक मुलगा

Published by: sachin Salve
First published: November 25, 2020, 7:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या