'मंत्री' होऊन गोव्याला गेला आणि मसाजमुळे झाली पोलखोल!

'मंत्री' होऊन गोव्याला गेला आणि मसाजमुळे झाली पोलखोल!

सरकरी पाहुणा बनून गोव्याला गेलेला 'मंत्री' आता पोलिसांचा पाहुणचार घेत आहे.

  • Share this:

पणजी, 10 जानेवारी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात एकाने तब्बल 12 दिवस सरकारी खर्चात सगळं गोवा पर्यटन केलं. त्यानंतर एक दिवस मसाजमुळे त्याची पोलखोल झाली. मंत्री असल्याचा बनाव करून गोव्यात सरकारी पाहुणचार घेणाऱ्या उत्तर प्रदेशातील सुनील कुमार सिंगला आता पोलिसांचा पाहुणचार मिळत आहे. लखनऊचा असलेल्या सुनील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लखनऊत राहणाऱ्या सुनील कुमारने जवळपास दोन आठवडे सरकारी सुविधांचा फायदा घेतला. यावेळी त्याने आपण उत्तर प्रदेशातील मंत्री असल्याचं सांगितलं. त्याच्या जोरावर त्याला राज्याच्या पाहुण्यांसाठी असेलल्या सर्व सेवा सुविधा मिळाल्या. यामध्ये सरकारी गाडी, एक पोलिस अधिकारी त्यांना पर्यटनासाठी सोबत देण्यात आला होता. एवढंच नाही तर दक्षिण गोव्यातील एका कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणेही करण्यात आलं होतं.

मंत्री असल्याची बतावणी करून तेवढ्यावरच सुनील कुमार थांबला नाही. तर त्याने ड्रिंकवेळी त्याने मसाज करण्यासाठी तरुणीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांना थोडा संशय आला. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सुनील कुमारने गोव्यातील प्रोटोकॉल डिपार्टमेंटला एक मेल केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर सुनील कुमारसाठी तीन दिवसांसाठी एक रूम बूक करण्यात आली होती.

सुनील कुमार उत्तर प्रदेशात एका कोऑपरेटिव्ह सोसायटीचा माजी उपाध्यक्ष आहे. त्याच्याकडे राज्याचे कोऑपरेटिव्ह मंत्री गोविंद गौडे यांचे शिफारसपत्र होते असं म्हटलं जात आहे. दक्षिण गोव्यात एका कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणा करण्यात आलं होतं. तिथं सुनिल कुमारने 10 कोटी देण्याचं आश्वासनही देऊन टाकलं होतं. आता त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

इंटरनेट मुलभूत अधिकार, जम्मू काश्मीरबद्दल निकाल देताना सुप्रीम कोर्टाने सुनावलं

Published by: Suraj Yadav
First published: January 10, 2020, 2:01 PM IST
Tags: goa

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading