स्वयंघोषित संत रामपालला आणखी एका खून प्रकरणात जन्मठेप

स्वयंघोषित संत रामपालला आणखी एका खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ४ महिलांसह ५ जणांच्या हत्येचा गुन्हा या बाबावर नोंदवण्यात आला होता. त्याप्रकरणी कालच हरियाणाच्या कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2018 01:11 PM IST

स्वयंघोषित संत रामपालला आणखी एका खून प्रकरणात जन्मठेप

हिसार, १७ ऑक्टोबर : स्वयंघोषित संत रामपालला आणखी एका खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपालच्या हरियातल्या आश्रमात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर आश्रमातल्या १३ जणांसह रामपालवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

११ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीतच या सर्वांना कोर्टानं दोषी ठरवलं होतं. शिक्षेची अंतिम सुनावणी आज बुधवारी झाली. रामपालला आणखी एका जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

काल झालेल्या दुसऱ्या एका प्रकरणातील सुनावणीच्या वेळी रामपालला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली होतीच.

या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यातल्या जखोरा गावातला सुरेश नावाच्या व्यक्तीनं रामपालविरोधात तक्रार नोंदवली होती. हिसारच्या आश्रमात रामपाल आणि त्याच्या अनुयायांनी अनेक जणांच्या पत्नींना डांबून ठेवल्याची ही तक्रार होती. २०१४मध्ये एका महिलेच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला.

हरयाणाच्या सतलोक आश्रमाचा कथित संत बाबा रामपालला कालच हिसार कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ४ महिला आणि एका बालकाची हत्या केल्याचा आरोप या बाबावर होता. आजीवन कारावासासह १ लाखाचा दंडही रामपालला भरावा लागणार आहे.

Loading...

४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा

२०१४च्या नोव्हेंबरमध्ये पोलीस आणि रामपालचे समर्थक यांच्यात संघर्ष झाला होता. यामध्ये ५ महिलांचा आणि एका बालकाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान आज ही सुनावणी असल्यानं हिसार भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १५०० हून अधिक जवान शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत.

या प्रकरणाची २०१४मध्ये न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये युद्ध पेटलं आहे. मुजोर समर्थकांच्या गुंडगिरीविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आणि बाबा रामपालवर देशद्रोहाचा गुन्हही दाखल झाला. बाबा समर्थक आणि पोलिसांमधल्या झालेल्या चकमकीत 6 जणांचा बळी गेला.

हे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2018 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...