कर्ज फेडण्यासाठी 72 वर्षाच्या लक्ष्मीबाई करतात टाईप रायटरचं काम

कर्ज फेडण्यासाठी 72 वर्षाच्या लक्ष्मीबाई करतात टाईप रायटरचं काम

ही कथा आहे मध्य प्रदेशातील सेहोर भागातील एका सुपर वुमनची. ही 72 वर्षीय वृद्ध महिला चक्क टाईप राईटरचं काम करून आपलं पोट भरते आहे.

  • Share this:

मध्य प्रदेश, 15 जून : ही कथा आहे मध्य प्रदेशातील सेहोर भागातील एका सुपर वुमनची. ही 72 वर्षीय वृद्ध महिला चक्क टाईप राईटरचं काम करून आपलं पोट भरते आहे.

72 वर्षांच्या या लक्ष्मीबाई मध्य प्रदेशच्या सेहोर भागात एका जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टाईप रायटरचं काम करतात.एका अपघातात लक्ष्मीबाईंची मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिचा उपचार करण्यासाठी लक्ष्मीबाईंनी जे कर्ज काढलं होतं ते फेडण्यासाठी त्यांनी टाईप रायटरचा पर्याय निवडला. गावातील जिल्हाधिकारी राघवेंदर सिंग आणि उप-विभागीय दंडाधिकारी भावना विलांबे यांच्या मदतीनं लक्ष्मीबाईंनी 72व्या वर्षी पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू केलं.

आता या लक्ष्मीबाईंची ओळख सुपर वुमन अशी झालीये. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं आपल्या ट्विटर हँडलवर या लक्ष्मीबाईंचा व्हिडिओ शेअर केलाय. विरूने या व्हिडिओत लक्ष्मीबाईंचा उल्लेख सुपर वुमन म्हणून केलाय. शरीराने जरी ही सुपरवुमन थकली असली तरी मनाने मात्र आजही ती चिरतरूणचं आहे.त्यामुळे लक्ष्मीबाईंना खरी गरज आहे ती तुमच्या मदतीची.

First published: June 15, 2018, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading