S M L

संसद परिसरात घुसली काँग्रेस खासदाराची कार, जवानांनी रोखल्या बंदुका!

संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक असते. अशी व्यवस्था असतानाही आज 11.40 च्या सुमारास घडलेल्या घटनेने सुरक्षा व्यवस्था हादरुन गेलीय.

Updated On: Feb 12, 2019 03:00 PM IST

संसद परिसरात घुसली काँग्रेस खासदाराची कार, जवानांनी रोखल्या बंदुका!

नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : संसदेच्या अधिवेशनाचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता . आणि त्याच दिवशी एका घटनेने सुरक्षा व्यवस्था हादरुन गेलीय. सकाळी एका खासदाराची कार संसद भवन परिसरातल्या कठड्यांना जाऊन धडकल्याने सुरक्षा दलाची एकच धावपळ उडाली नेमकं काय झालं हे लक्षात न आल्याने जवानांनी तातडीने कारला थांबवली. या घटनेमुळे परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय.


संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक असते. अशी व्यवस्था असतानाही आज 11.40 च्या सुमारास घडलेल्या घटनेने सुरक्षा व्यवस्था हादरुन गेलीय. खासदाराचं स्टिकर असलेल्या एका कारने रस्ता बदला आणि ती सुरक्षा कठड्यांना धडकली. तैनात असलेल्या सुरक्षा जवानांनी तातडीने कारच्या दिशेने बंदुकाही रोखल्या होत्या.Loading...


मात्र लगेच ती कार ही काँग्रेसचे मणिपूरचे खासदार डॉ.थोकचोम मेनिया यांची असल्याचं स्पष्ट झालं. सुरक्षा दलाने तातडीने ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा हा केवळ अपघात असल्याचं स्पष्ट झालं. अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरच्या बाजूची एअर बॅग निघाल्याने कुणालाही दुखापत झाली नाही.


मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्थेचा आढवा घेण्यात आला असून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संसद भवनावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था बहुस्तरीय करण्यात आली होती. अतिशय हायटेक सुरक्षा व्यवस्था असतानाही अशी घटना कशी घडली  याचा अभ्यास करण्यात येतोय.

टोल नाक्याजवळ येताच एसटी बसचे ब्रेक झाले फेल; काळजाचा ठोका चुकविणारा VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 03:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close