श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटानंतर गोव्यातल्या चर्चेसच्या सुरक्षेत वाढ

श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटानंतर गोव्यातल्या चर्चेसच्या सुरक्षेत वाढ

गोव्यात साडेचारशे वर्षांपूर्वीची चर्चेस आहेत. तसच परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येत असतात त्यामुळे खास खबरदारी घेण्यात आली होती.

  • Share this:

अनिल पाटील, पणजी, 21 एप्रिल : श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर गोव्यातल्या चर्चेसची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं असून सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती गोव्याचे पोलीस महानिरिक्षक जसपाल सिंग यांनी दिली. निवडणुकीमुळे पोलीस अन्य कामात गुंतले आहेत. मात्र अतिरिक्त कुमक मागवून पेट्रोलिंग वाढविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्रीलंकेतल्या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातल्या सर्व चर्चेसची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यात साडेचारशे वर्षांपूर्वीची चर्चेस आहेत. यात सी कॅथेड्रिल, सेंट झेव्हियर आणि बॅसिलिका ऑफ बाम जेजेस या वल्ड हेरिटेज मोनोमेन्ट्सचाही समावेश आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात आहेत याशिवाय 23 एप्रिलला गोव्यात  मतदान होत आहे याचा विचार करून सर्व ठिकाणची सुरक्षा वाढविण्यात अली आहे.प्रमुख्याने चर्चेस आणि हॉटेल परिसरातील बंदोबस्त चोख करण्यात आला आहे. चर्चेस परिसरात शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती गोवा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

श्रीलंकेतल्य स्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू

श्रीलंकेची राजधानी कोलंबोसह देशातील अनेक ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या मृतांची संख्या 215 वर गेली आहे तर 450 जण जखमी आहेत. श्रीलंकेतल्या सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश असल्याची माहितीही आता पुढे आली आहे. त्यातल्या एका महिलेचं नाव लक्ष्मी असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिली आहे.

गेल्या काही तासांमध्ये झालेल्या या बॉम्ब स्फोटांनी संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत श्रीलंकेत 8 बॉम्बस्फोट झाले असून त्यातले सहा आत्मघाती होते अशी माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

असे झाले बॉम्बस्फोट

कोलंबो शहरात दुपारी झालेल्या शेवटच्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहेत. दरम्यान, या स्फोटांमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समजते. संचारबंदी लागू केल्यानंतर आता सोशल मीडियावरही बंदी घालण्या आली आहे. 22 आणि 23 एप्रिलला सरकारने सुटीही जाहीर केली आहे.

इस्टर संडेच्या पवित्र दिवशीच चर्चमध्येही हे स्फोट घडविण्यात आले.  एक स्फोट कोलंबोतील पोर्टच्या कोचीकडे चर्चमध्ये तर दुसरा हल्ला पुत्तलम जवळच्या सेंट सेबेस्टियन चर्चमध्ये झाला. याशिवाय मार्केटमध्येही करण्यात आला आहे. कोलंबोतल्या शांगरी ला हॉटेल आणि किंग्जबरी हॉटेलमध्येसुद्धा बॉम्बस्फोट झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goa
First Published: Apr 21, 2019 11:00 PM IST

ताज्या बातम्या