काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची ‘हिट लिस्ट’, हे TOP 10 दहशतवादी आहेत रडावर

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची ‘हिट लिस्ट’, हे TOP 10 दहशतवादी आहेत रडावर

सुरक्षा दलांनी आता नवीन यादी तयार केली असून त्यात पहिल्या आणि दुसऱ्या फळीतल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली  14 मे: सुरक्षा दलांनी काश्मीरमधल्या काही दिवसांपूर्वीच प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हिजबुलचा कमांडर रियाज नायकूला ठार केल्यानंतर सुरक्षा दलाने आता नवीन हिट लिस्ट तयार केली आहे. गेली काही वर्षात सुरक्षा दलांनी निवडून नियोजनपूर्वक या दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यानंतर हिजबुलने नव्या कमांडरची घोषणा केली होती. त्यामुळे कुठलीही उसंत न घेता सुरक्षा दलांनी आता नवीन यादी तयार केली असून त्यात पहिल्या आणि दुसऱ्या फळीतल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या गोटात सुरक्षा दलांविषयी जरब निर्माण झाली आहे.

या नव्या हिट लिस्टमध्ये हुजबुलचा नवा कमांडर सैफुल्ला उर्फ गाजी हैदर, मोहम्मद अशरफ खान उर्फ अशरफ मौलवी, जुनैद सहराई आणि अब्बास शेख, जैश ए मोहम्मदचा जाहिद जरगार, फैजल आणि सलीम पारे तर लष्कर ऐ तोयबाचा शकूर आणि शेहराज अल लोन याचाही समावेश आहे.

गेली अनेक वर्षं 'तो' काश्मीर खोरं अशांत राहावं म्हणून लोकांना भडकवण्याचं काम करत होता. सुरक्षा दलाचे जवान त्याचं लक्ष्य होतं. कुख्यात दहशतवादी आणि हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर रियाझ नायकू (Riyaz Naikoo) याचा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अखेर खात्मा झाला. तो काश्मिरी दहशतवादाचा नवा चेहरा बनू पाहात होता.  काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना हे मोठं यश कसं मिळाली, याची माहिती आता समोर येत आहे.

व्हायरसला दूर ठेवणारं PPE किट झालं तयार, कोरोनाविरूद्धच्या लढाईत यश

 सुरक्षा दलाच्या या कारवाईत एकही निष्पाप नागरिक मारला गेला नाही किंवा जखमीही झाला नाही. रात्रीत सापळा रचून दहशतवाद्याला लक्ष्य केलं गेलं. रियाझ नायकू हा गेले अनेक दिवस काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवत होता. त्याच्यावर 12 लाखाचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं. पोलीस आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करत त्याने काश्मीरमध्ये अनेक कारवाया केल्या होत्या. दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत रियाझ मारला गेला.

संबंधित - हिज्बुलच्या कमांडर रियाझ नायकूचा खात्मा; गणिताचा शिक्षक कसा झाला क्रूरकर्मा दहशतवादी?

2016 मध्ये बुरहान वाणीच्या अंतानंतर रियाझ नायकूचं नाव पुढे आलं होतं. तो काश्मीर खोऱ्याच्या दहशतवादाचा नवा चेहरा बनला होता. पोलिसांच्या कुटुंबीयांचं अपहरण, कुणी दहशतवादी मारला गेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी बंदुकीची सलामी देणं अशा कारवायांनी तो चर्चेत होता. काश्मीरमधल्या युवा पिढीला दहशतवादाकडे खेचून घेण्याचं काम तो करत होता.

First Published: May 14, 2020 05:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading