लष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद

लष्कराकडून 4 दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत 1 जवान शहीद

सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवरच गोळीबार सुरू केला. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.

  • Share this:

जम्मू-काश्मीर, 20 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाने 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पण दुर्देवाने या चकमकीत भारताचाही एक जवान शहीद झाला आहे. काल (सोमवारी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीगम या शोपियातील गावामध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली. त्यानंतर सैन्याने या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं.

सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवरच गोळीबार सुरू केला. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना संपवण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. पण याच चकमकीत भारताचाही एक जवान शहीद झाला. तसंच दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याभागातील चकमक सध्या थांबली आहे. तर सुरक्षा दलाचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे.

VIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप

First published: November 20, 2018, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading