S M L

जम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

एका इमारतीत दहशतवादी लपल्याची माहिती आहे.सीआरपीएफ कॅम्प जवळच्या इमारतीत दहशतवादी लपलेत. या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2018 12:33 PM IST

जम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

13 फेब्रुवारी : जम्मू-काश्मिरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय. श्रीनगरमधल्या करण नगर भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. एका इमारतीत दहशतवादी लपल्याची माहिती आहे.सीआरपीएफ कॅम्प जवळच्या इमारतीत दहशतवादी लपलेत. या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय.

सुंजवा इथे लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर सोमवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील करण नगर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. श्रीनगरच्या करन भागात सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलीस दल) शिबिरावर सोमवारी सकाळी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी कोसळत्या बर्फात उधळून लावला.

यानंतर अतिरेकी लपून बसले असता निमलष्करी दलाच्या जवानाने त्यांना पाहिले. तेव्हा उडालेल्या चकमकीत निमलष्करी दलाचा एक जवान शहीद झाला आहे. अतिरेक्यांना शोधण्यासाठी आॅपरेशन सुरू आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेचा काश्मीरचा प्रमुख मेहमूद शाह याने हा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close