मराठी बातम्या /बातम्या /देश /

फुटीरतावाद्यांचा राजेशाही थाट, सुरक्षेवर वर्षाला 10 कोटींचा खर्च!

फुटीरतावाद्यांचा राजेशाही थाट, सुरक्षेवर वर्षाला 10 कोटींचा खर्च!

फुटीरतावादी नेत्यांचा थाट हा राजेशाही होता. करोडो रूपये त्यांच्या सुरक्षेसाठी  खर्च केले जात होते.

फुटीरतावादी नेत्यांचा थाट हा राजेशाही होता. करोडो रूपये त्यांच्या सुरक्षेसाठी खर्च केले जात होते.

फुटीरतावादी नेत्यांचा थाट हा राजेशाही होता. करोडो रूपये त्यांच्या सुरक्षेसाठी खर्च केले जात होते.

श्रीनगर, 17 फेब्रुवारी : सुरक्षा व्यवस्था काढत सरकारनं फुटीरवाद्यांना मोठा दणका दिला आहे. मीरवाइज उमर फारूख, अब्दुल गनी बट्ट, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि शब्बीर शाह या पाच फुटीरतावादी नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे या फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेवर वर्षाला 10 कोटी रूपयांचा खर्च केला जात होता. शिवाय, महागड्या गाड्या, हॉटेल्स आणि मोठ्या रूग्णालयांमध्ये उपचार अशा सुविधा देखील सरकार या फुटीरतावादी नेत्यांना देत होतं.

पण, यापुढे मात्र या सुविधा फुटीरतावादी नेत्यांना मिळणार नाहीत. एका नेत्याच्या सुरक्षेसाठी जवळापास 20 ते 25 सुरक्षा रक्षक हे दिवस - रात्र होते. पण, पुलवामा हल्ल्यानंतर सरकारनं आता फुटीरतावादी नेत्यांकडे देखील लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चापैकी एकूण 10 टक्के निधी हा फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेवर खर्च होत होता.

फुटीरतावादी नेत्यांचे आयएसआयशी असलेले संबंध तपासून पाहण्याचे आदेश देखील केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले होते. सुरक्षा यंत्रणांनी या साऱ्या बाबींचा आढावा घेतला. त्यानंतर रिपोर्ट सादर करण्यात आला. अखेर या रिपोर्टवर कार्यवाही करत पाच फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. राज्यामध्ये 25 लोकांकडे झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. शिवाय, जवळपास 1200 लोकांना विविध प्रकारच्या सुरक्षा पुरवण्यात आलेल्या आहेत.

मीरवाईजच्या सुरक्षेवर 5 कोटी

फुटीरतावादी नेत्यांमध्ये मीरवाईज उमर फारूखच्या सुरक्षा व्यवस्थेवर सर्वाधिक खर्च होत होता. शिवाय, सुरक्षेमध्ये डीएसपी रँकचे अधिकारी देखील तैनात होते. सर्व फुटीरतावादी नेत्यांची जीवनशैली ही उंच दर्जाची अशीच आहे.

जमिनीची खरेदी

फुटीरतावादी नेते हे मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी करतात. कारण नातेवाईकांच्या नावार घेतलेल्या जमिनीची चोरी पकडली जात नाही. शिवाय, दिवसेंदिवस जमिनीचे दर देखील वाढत आहेत. खरेदी केलेल्या जमिनीमध्ये अक्रोड आणि फळांची शेती करण्यावर फुटीरतावादी नेत्यांचा भर असतो.

यासीन मलिकची करोडोंची संपत्ती

फुटीरतावादी नेता यासीन मलिकची संपत्ती ही करोडोंमध्ये आहे. यासीन मलिककडे जवळपास 150 कोटींपेक्षा जास्त संपती आहे. श्रीनगरमध्ये असलेल्या हॉटेलची किंमत ही 20 ते 40 कोटी रूपये एवढी आहे.

शब्बीर शाह या फुटीरतावादी नेत्याकडे देखील करोडोंची संपत्ती आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी प्रत्येक नेत्याच्या संपत्तीची माहिती देखील गोळा केली आहे.

सय्यद अली शहा गिलानी या नेत्याकडे देखील करोडोंची संपत्ती आहे. ज्यामध्ये फ्लॅट, शाळा, घर इत्यादींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे ही सारी संपत्ती गिलानीनं त्याच्या मुलांच्या नावावर करून ठेवली आहे.

'मेरे घर मे हैं मेरी बुढी माँ', शहीद नितीन राठोड यांच्या नावाने भावुक VIDEO व्हायरल

First published:

Tags: Pulwama attack, Separatist leaders, Terror group