मराठी बातम्या /बातम्या /देश /

इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना कसा 8 लोकांनी गमावला जीव, पहिला INSIDE VIDEO आला समोर

इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना कसा 8 लोकांनी गमावला जीव, पहिला INSIDE VIDEO आला समोर

इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना मोठा स्फोट झाला आणि मोठी आग लागली. यामध्ये 8 जणांना जीव गमवावा लागला

इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना मोठा स्फोट झाला आणि मोठी आग लागली. यामध्ये 8 जणांना जीव गमवावा लागला

इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना मोठा स्फोट झाला आणि मोठी आग लागली. यामध्ये 8 जणांना जीव गमवावा लागला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Telangana, India
  • Published by:  Kranti Kanetkar

हैदराबाद, 14 सप्टेंबर : इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना आगीचा भडका उडाल्याची थरारक घटना समोर आली होती. या घटनेमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बाकी लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलं. ही आग एवढी भयंकर होती की काही मिनिटांत शोरूममध्ये पसरली. परिसरात धुराचे लोट दिसत होते.

ही आग नक्की कशी लागली हे दाखवणारा पहिला INSIDE CCTV व्हिडीओ समोर आला आहे. शोरूम सिकंदराबादमध्ये पार्सपोर्ट ऑफिसच्या जवळ आहे.या दुर्घटनेत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला.

ही अत्यंत दुर्दैवी घटना असून याची चौकशी करण्यात येईल असं तेलंगणाचे गृहमंत्री म्हणाले. अग्निशमन दलाच्या पथकांनी लॉजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा-'मैंने शेर को मारा' म्हणत वृद्धाने माकडला मारले, घरावरही लटकवले, भंडाऱ्यातील घटना

या आगीत शोरूम जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. आग लागल्यानंतर शोरूममधून धुराचे लोट उठू लागल्याचे पाहून लोक घाबरले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल तेलगंणा सरकारने घेतली आहे.

तामिळनाडूमध्येही असाच प्रकार घडला होता.

तमिळनाडूमध्ये एप्रिल महिन्यात अशीच एक घटना घडली होती. तामिळनाडूतील पोरूर-कुंदरातूर शोरूममध्ये एका ग्राहकाने आपल्या ई-बाईकची बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली होती. काही वेळातच आग लागली. हळूहळू संपूर्ण शोरूम आगीत जळून खाक झाले. या घटनेत 5 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या 12 जुन्या इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाल्या होत्या.

First published:

Tags: Fire, Telangana