नवी दिल्ली, 04 जानेवारी : देशाच्या संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते आणि संयोजक नंदकुमार यांनी केली आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यात असलेल्या धर्मनिरपेक्ष शब्दावर केंद्राने पुन्हा विचार करावा, हा शब्द पाश्चिमात्यांकडून आला असल्याचंही त्यांनी म्हटलं.
आरएससच्या एका पदाधिकाऱ्याच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नंदकुमार बोलत होते. त्यावेळी आरएसएसचे जेष्ठ नेते कृष्ण गोपाल उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले की, भारतात धर्मनिरपेक्ष शब्दाची गरज नाही. धर्मनिरपेक्ष असल्याचा बोर्ड लावण्याची खरंच गरज आहे का हे बघावे लागणार आहे. व्यवहार, काम आणि भूमिकेतून हे सिद्ध करावं लागणार आहे का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी पश्चिम बंगालचे इस्लामीकरण या पुस्तकातून टीका केली आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष या शब्दाची गरज नसल्याचेही म्हटलं. तसेच सविंधानाचे संस्थापकसुद्धा या शब्दाच्या विरोधात होते असा दावाही नंदकुमार यांनी केला आहे.
नंदकुमार म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कृष्ण स्वामी अय्यर यांच्यासह संविधान समितीतमधील सर्व सदस्य धर्मनिरपेक्ष या शब्दाच्या विरोधात होते. त्यानी धर्मनिरपेक्ष शब्द संविधानाच्या प्रस्तावनेत समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही असं म्हटलं होतं. तरीही त्यांची मागणी फेटाळून शब्दाचा समावेश करण्याचा आल्याचा दावा नंदकुमार यांनी केला. इंदिरा गांधींनी जेव्हा 1976 मध्ये धर्मनिरपेक्ष शब्दावर जोर दिला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे मत स्वीकारण्यात आलं नव्हतं असंही ते म्हणाले.
वाचा 'शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सावरकर भाजपला मान्य आहेत का?' मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.