मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर TOP बातम्या

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारे निर्णय आणि वक्तव्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेला सर्वात मोठा झटका देणारा निर्णय एकनाथ शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आशीष शेलारांकडे मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळेंची वर्णी लागली आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. मुंबईत आता प्रति सेनाभवन उभं राहणार? मुख्य शिवसेनेचं मुंबईच्या दादर येथली छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ भव्य शिवसेना भवन आहे. या शिवसेना भवनावर आपला हक्क न सांगता शिंदे गटाने दादरमध्येच प्रति शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यात सत्तांतरानंतर गावागावांत आता कोणाची सत्ता? राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आशीष शेलारांकडे मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळेंची वर्णी आशीष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. MIM ला सोलापूरात मोठं खिंडार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत MIM पक्षाच्या 6 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तौफिक शेख, तस्लीम शेख, नुतन गायकवाड, पुनम बनसोडे, वाहिदाबानो शेख, शहाजीदा शेख हे MIM नगरसेवक आज राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राजकारण्यांच्या 'मोफत वाटपा'च्या घोषणांवर महत्त्वाची टिप्पणी सध्याला देशात मोफत संस्कृतीवरुन चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टातही यावरुन याचिका दाखल केली होती. यावर आता सुप्रीम कोर्टाने मत मांडलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत ही माहिती दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. Laal Singh Chaddha विरोधात कोल्हापूरात भाजप, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या सिनेमाला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत आहे. सिनेमा बायकॉट करण्याची मागणी जोर धरत असताना सिनेमा काल 11 ऑगस्टला प्रदर्शित झाला. मात्र होणाऱ्या तीव्र विरोधामुळे सिनेमाला हवं तसं यश मिळू शकलं नाही. या विरोधात कोल्हापूरात आंदोलन करत सिनेमाच्या पोस्टवर काळी शाई फासण्यात आली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या